"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
==सांगीतिक कारकीर्द==
 
आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष - (पद्यगायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री - (पद्यगायक नट) भूमिकाही केल्या.
 
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
 
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.