"क्युबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२:
'''क्यूबाचे प्रजासत्ताक'' ({{lang-es|República de Cuba}}) हा [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे. क्यूबाच्या उत्तरेस [[अमेरिका|अमेरिकेचे]] [[फ्लोरिडा]] राज्य, ईशान्येस [[बहामास]] व [[टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह]], पश्चिमेस [[मेक्सिको]], दक्षिणेस [[केमन द्वीपसमूह]] व [[जमैका]] तर आग्नेयेस [[हैती]] व [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] हे देश आहेत. [[हवाना]] ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
 
[[स्पेन|स्पॅनिश]] प्रवासीमहान संशोधकनाविक [[ख्रिस्तोफर कोलंबस]] येथे इ.स. १४९२ मध्ये पहिल्यांदा दाखल झाला. काही काळातच स्पेनने हा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढील अनेक शतके स्पेनची वसाहत राहिल्यावर १८९८ सालच्या अमेरिका-स्पेन युद्धानंतर १९०२ साली क्यूबाला स्वातंत्र्य मिळाले. पुढील काही दशके येथे लोकशाही राहिल्यानंतर १९५२ साली [[फुल्गेन्स्यो बतिस्ता]]ने क्यूबामध्ये येथे [[हुकुमशाही]] स्थापन केली. बतिस्ताच्या जुलुमी राजवटीविरुद्ध क्रांती उभारणाऱ्या [[फिडेल कॅस्ट्रो]] ह्या सेनानीने लष्करी लढा देऊन १९५९ साली बतिस्ताची सत्ता उलथवून लावली. १९६५ सालापासून क्यूबामध्ये कॅस्ट्रो व त्याचा भाऊ [[राउल कास्त्रो]] ह्यांच्या नेतृत्वाखाली [[साम्यवादी]] प्रशासन अस्तित्वात आले. [[शीत युद्ध]]ादरम्यान क्यूबा [[सोव्हियेत संघ]]ाच्या निकटवर्ती राष्ट्रांपैकी एक होता.
 
जगात अस्तित्वात असलेल्या फार थोड्या कम्युनिस्ट राजवटींपैकी एक असलेल्या क्यूबामध्ये सध्या राजकीय स्थैर्य व सुबत्ता आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्युबा" पासून हुडकले