"श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.संदर्भयादी दिली
ओळ २:
 
===स्थापना===
===गंगामाई महिलालयाच्या संस्थापिका श्री.स.सौ.गंगामाई नारायणराव घोरपडे===
श्री.स.सौ.गंगामाई महिलालय या संस्थेने गंगामाई विद्यामंदिरची स्थापना १९६२ साली केली.
इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव [[बाबासाहेब घोरपडे]] यांच्या पत्नी सौ. गंगामाई या अहमदनगरचे सुप्रसिद्ध वकील मोहिनीराज मोरेषर परांजपे यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८६५ रोजी नेवासे येथे झाला. त्यांचा विवाह २८ मार्च १८७६ रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्याशी झाला. नारायणराव शिक्षणप्रेमी असल्यामुळे त्यांनी गंगामाईना इंग्रजी शिकवण्यासाठी इंग्रज मडमेची व्यवस्था केली होती. त्या इंग्रजी भाषेत संभाषण आणि पत्रलेखन करत असत. स्त्रियांचा दुपारचा वेळ केवळ गप्पा मारण्यात जाऊ नये आणि एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी, सर्वांची प्रगती व्हावी या हेतूने त्यांनी ३ मार्च १९२७ रोजी श्री.स.सौ.गंगामाई महिलालय या संस्थेची स्थापना केली.संस्थेसाठी एक भव्य वस्तू बांधून घेतली. महिलांना पाकशास्त्र, शिवणकला, भरतकाम, विणकाम या कलांचे प्रशिक्षण देणारे वर्ग सुरु केले. अनेक प्रकारच्या स्पर्धाही घेतल्या जात.स्वत: गंगामाई या कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. इचलकरंजी मध्ये त्यांनी अनेक सुधारणा केल्या. प्रसूतीगृहाची सोय केली.स्वत:कडील ग्रंथसंपत्ती पुणे विद्यापीठास भेट म्हणून दिली. तेथेच एम.ए. इतिहास या विषयासाठी शिष्यवृत्ती ठेवली.त्यांचा मृत्यू इचलकरंजी येथे २३-१२-१९५७ रोजी झाला.
===गंगामाई महिलालयाची वाटचाल===
संस्थेच्या वतीने अनेक वर्षे वाचनालय, शिवणक्लास, भजनवर्ग, पाळणाघर असे उपक्रम चालवले गेले. संस्थेत अनेक वर्षांपासून महिलांसाठी सुरु असलेले 'टेबल टेनिस' आणि 'बॅडमिंटन कोर्ट' हे सुद्धा एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.पुढे या संस्थेने गंगामाई विद्यामंदिरची स्थापना ५ जून १९६२ रोजी केली.
===गंगामाई महिलालय या संस्थेच्या माजी अध्यक्षा===
*सुधाताई मराठे (१९८५-१९८८)
*शशिकलाबाई मराठे(१९८८-१९९१)
*निर्मलाताई बानावली (१९९१-१९९४)
*आशाताई सौन्दत्तीकर(१९९४-१९९७)
*सुवर्णा शहा(१९९७-२०००)
*वंदना केळकर(२०००-२००३)
 
===वर्ग आणि विद्यार्थी संख्या===
ही शाळा मुला-मुलींची एकत्र असून बालवाडीपासून ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आहेत.शाळेचे माध्यम मराठी आहे. सध्या शाळेत सुमारे ८५०१२५० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
 
===मुख्याध्यापिका===
 
===व्यवस्थापन===
 
Line १५ ⟶ २६:
 
===उल्लेखनीय माजी विद्यार्थी===
 
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
संदर्भ :
#{{सुवर्ण दीप-स्मरणिका, गंगामाई विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवी वर्ष |last= |first= |authorlink= |coauthors= |year=२०१२ |month= |title= |journal= |volume= |issue= |pages= |id= |url= |accessdate= २०१७-१०-०२ |quote= }}
#{{अमृत गंगा स्मरणिका, गंगामाई महिलालय अमृत महोत्सवी वर्ष |last= |first= |authorlink= |coauthors= |year=२००२ |month= |title= |journal= |volume= |issue= |pages= |id= |url= |accessdate= २०१७-१०-०२ |quote= }}
 
[[वर्ग:इचलकरंजी]]