"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
=== सल्ला ===
===व्यंगचित्र===
[[सदस्य:संतोष हंबीरराव चव्हाण|संतोष हंबीरराव चव्हाण]] ([[सदस्य चर्चा:संतोष हंबीरराव चव्हाण|चर्चा]]) ०७:३०, २७ सप्टेंबर २०१७ (IST)संतोष चव्हाण=== वाचकांचा पत्रव्यवहार ===
=== वाचकांचा पत्रव्यवहार ===
'वाचकांचा पत्रव्यवहार'हे सदर २०व्या शतकापासून आजही दैनिके, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके इत्यांदीमध्ये आपले अस्तित्त्व टिकवून आहे. वूत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच पत्रव्यवहाराचे सामाजिकदृष्टीने असणारे महत्त्व अोळखून संपादकांनी पत्रव्यवहारास खास जागा दिली. वाचकांना आपली मते, विचार, अपेक्षा, तक्रारी, क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पत्रातून समाजमनाची स्पंदने, समाजाच्या जाणिवाच व्यक्त होतात. जागतिक घडामोडी,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांना स्पर्श करणारी ही मनोगतपर परखड पत्रे असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबाबत तात्काळ मतनोंदणी करणारे,ग्रामीण आणि नागरी सुविधेबाबत विकासातील त्रुटी सांगणारे, नाराजी, निषेध करणारे, चांगल्या बातमींचे स्वागत तसेच अभिनंदन करणारे असे लेख वाचकांचे पत्रव्यवहारमध्ये असतात. वाचकांना लिहिते करणाऱ्या, अभिव्यक्तीस जागा देणाऱ्या अशा पत्रव्यवहारातून विचारमंथनास चालना मिळते.वाचकांच्या पत्रातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटत असते. अशा पत्रव्यवहारातून शिक्षण, सामाजिक सुधारणा, विचारक्षमता,संवेदनशीलता विकसित होऊन जागृत आणि प्रगल्भ समाजनिर्मितीस पोषक वातावरण निर्माण होते.