"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,९८४ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
== पत्रकारिता ==
=== शोध पत्रकारिता ===
शोध पत्रकारिता : (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम). वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असुन उरलेल्या तीन आधारस्तंभांवर लक्ष ठेवण्याचे काम वृत्तपत्रांना करावे लागते. परंतु त्या क्षेत्रांत वावरणाऱ्या मंडळींची अपकृत्ये सहजपणे चव्हाट्यावर येतात असे नाही. अशी कृत्ये उघडकीस येईपर्यंत पत्रकारांनी वाट पहावी, की अशा अपकृत्यांचा वृत्तपत्रांनी आपणहून शोध घ्यावा आणि त्यांच्यावर प्रकाशझोत टाकावा असा प्रश्न आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेमध्ये आणि १९७० च्या दशकात भारतामध्ये शोध (वा शोधक) पत्रकारितेचा प्रारंभ झाला. अमेरिकेमध्ये १९६७ नंतर काही पत्रकारांनी व्हिएटनाममधील अमेरिकेच्या घोडचुकांबद्दल संशोधन करून लिहायला सुरूवात केली. परिणामत: जनमताच्या रेटयामुळे अमेरिकेला व्हिएटनाममधून माघार घ्यावी लागली. ‘पेंटॅगॉन पेपर्स या नावाने पत्रकारितेचा हा कालखंड प्रसिध्द आहे. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकातून गाजलेले वॉटरगेट प्रकरण पुढे उघड करण्यात आले व परिणामी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतातही मध्य प्रदेशातील आदिवासी भागात होणारी कमलासारख्या स्त्रियांची विक्री, भागलपूरच्या तुरूंगात कैदी गुन्हेगारांच्या डोळ्यात अॅसिड घालण्याचा प्रकार, क्युओ या कंपनीशी  भारत सरकारने केलेल्या तेल खरेदीचा व्यवहार, महाराष्ट्र राज्यांतील उच्च पदस्थांनी सिमेंटच्या कोट्याच्या बदल्यात मिळविलेल्या देणग्या आणि बोफोर्स खरेदी मध्ये उच्च पदस्थांनी घेतलेली लाच इ. प्रकरणांच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. वृत्तपत्रांनी शोध पत्रकारितेचा अवलंब केला.

शोध पत्रकारितेची काही पथ्ये आहेत : भक्कम पुरावा मिळविणे, माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणे, संशोधनाचा झोत विशिष्ट पक्षापुरता किंवा विशिष्ट व्यक्तींपुरता मर्यादित न ठेवणे, गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी (ब्लॅकमेलिंग) याचा उपयोग होणार नाही याची दक्षता घेणे आणि संशोधनाअंतीचे निष्कर्ष प्रांजळपणाने मान्य करणे इत्यादी.
शोध पत्रकारितेमुळे संबधित व्यक्तींच्या अपकृत्यांबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. एवढेच नव्हे, तर अपकृत्यांना आळाही बसू शकतो. मात्र त्यासाठी शोध पत्रकारांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविणे आणि त्यांनी लिहिलेल्या मजकुराला जागा देणे, अशा तीन प्रकारे वृत्तपत्रांना अधिक खर्च करावा लागतो. काही प्रसंगी गैरकृत्ये करणाऱ्यांकडून धमक्या वा अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. परंतु वृत्तपत्राच्या प्रतिमेसाठी आणि जनमानसात आपुलकी, आदर व नैतिक दरारा निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रांना शोध पत्रकारितेचा उपयोग होऊ शकतो.
 
== बाह्य दुवे ==