"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३:
 
== वृत्तपत्रीय लेखन ==
वृ
वृत्तपत्राच्या किंवा नभोवाणी वा दुरचित्रवाणी यांसारख्या जनसंज्ञापनांच्या माध्यमातून वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या वृत्तविषयक गरजा भागवण्याचे कार्य म्हणजे ‘वृत्तपत्रकारिता’ असे म्हणता येईल.
लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. ही कल्पना प्रथम ⇨मेकॉलेने १८२८ मध्ये आपल्या ‘कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी’ या निबंधात मांडली. वृत्तपत्रांच्या संदर्भात त्याने ‘चौथी शक्ती’ असा शब्दप्रयोग केला होता. कार्लाइलने ऑन हीरोज, हीरो वरशिप अॅंड हिरोइक इन् हिस्टरी (१८४१ ) या आपल्या ग्रंथातील ‘द हिरो अॅज मॅन ऑफ लेटर्स’ या प्रकरणात ⇨एडमंड बर्कचे पुढील उदगार उदधृत केले आहेत. ‘मानवी जीवनाचे नियमन करणाऱ्या धर्मसत्ता (लॉर्डस स्पिरिच्युअल), राजसत्ता (लॉर्डस टेंपोरल) व लोकसत्ता (कायदेमंडळ) या तीन शक्तींप्रमाणे नव्हे, त्यांच्यापेक्षाही अधिक महत्वाची शक्ती म्हणजे पत्रकारिता (प्रेस गॅलरी) होय.’ या उदगारांतून पत्रकारितेचे महत्त्व व्यक्त झाले आहे.

पत्रकारितेची मुख्यत: तीन कार्ये असतात: माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन. ही कार्ये चांगल्या रीतीने पार पाडता यावीत म्हणून वृत्तपत्रे व पत्रकार यांना स्वातंत्र्याची आवश्यकता असते. वृत्तपत्रे व पत्रकार यांच्यावर सात प्रकारचे दवाब येत असतात : राज्यशासन, वृत्तपत्रसंस्थेचे व जनसंज्ञापन माध्यम संस्थेचे मालक, जाहिरातदार, समाजातील विविध हितसंबधी दबावगट, बातम्या व माहिती पुरविणारे स्रोत, वृत्तपत्राचा स्वार्थ आणि पत्रकाराचा वैयक्तिक स्वार्थ. या सात दबावगटांपैकी प्रत्येकाला वृत्तपत्राचा उपयोग करून आपले स्वत:चे हितरक्षण व हितसंवर्धन करावयाचे असते. या सर्व दबावगटांना खंबीरपणे तोंड देऊन पत्रकारितेला आपले कर्तव्य पार पाडायचे असते.  
   
निर्मितिखर्चापेक्षा कमी किंमतीला विकली जाणारी एकमेव वस्तू म्हणजे वृत्तपत्र होय. वृत्तपत्राच्या विक्रीतून कागदाचा खर्च जेमतेम भरून निघतो. वृत्तपत्रांना आपले सर्व प्रकारचे खर्च जाहिरांतीच्या उत्पन्नातून भागावावे लागतात आणि आवश्यक असा फायदा कमवावा लागतो. वृत्तपत्राने आपला व्यवसाय यशस्वी केला, तर त्याला आपले स्वातंत्र्य जपता येते आणि त्यांने आपले स्वातंत्र्य निष्ठापूर्वक जपले; तर त्याला आपल्या व्यवसायात यश मिळु शकते. व्यावसायिक यश व स्वातंत्र्याची जबाबदारी यांमध्ये समतोल साधणे हे वृत्तपत्राच्या यशाचे–म्हणजे विश्वासार्हतेचे, जाहिरातींच्या उत्पन्नाचे, प्रतिष्ठेचे-गमक असते.

भारताच्या राज्यघटनेत आविष्कारस्वातंत्र्य हा मूलभूत आधिकार म्हणून मान्य करण्यात आला आहे आणि आंतरराष्ट्रीय करारनाम्याचा कलम १९ (३) मध्ये मान्य करण्यात आलेल्या बंधनाचाच भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला आहे. [→ वृत्तपत्रविषयक कायदे ]. मात्र आंतरराष्ट्रीय करारनाम्यापेक्षा भिन्न अशी एक तरतूद भारतीय राज्यघटनेत आहे. आविष्कारस्वांतत्र्याचा अधिकार फक्त भारताच्या नागरिकांपुरताच मर्यादित करण्यात आला आहे. परदेशी पत्रकाराला तो भारतामध्ये उपलब्ध नाही. भारतीय पत्रकारितेच्या दृष्टीने मात्र सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय पत्रकारांच्या मूलभूत आविष्कारस्वातंत्र्याचे रक्षण करणारे ठरले आहेत.  
 
== मुख्य अंग ==