"दोलामुद्रित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
काम चालू साचा जोडला
छोNo edit summary
ओळ ९:
युरोपात मुद्रणकलेचा आरंभ भारताच्या तुलनेत आधी झाला असल्याने युरोपातील दोलामुद्राची कालमर्यादा १५व्या शतकापर्यंत मानण्यात येते. मराठीत दोलामुद्रिताची कालमर्यादा प्रारंभी प्रा. अ. का. प्रियोळकर ह्यांनी १८५० ही ठरवली होती{{Sfn|प्रियोळकर|१९४९|p=(१३)}}. मात्र विचारांती १८६७च्या अखेरपर्यंत अशी मर्यादा नंतर प्रियोळकरांनीच निश्चित केली आहे.
 
=== १८६७ ही मराठी दोलामुद्रितांची कालमर्यादा मानण्याचे कारण ===
दोलामुद्रितांची कालमर्यादा १८६७पर्यंत ठरवण्याचे कारण असे की १८६७साली देशी प्रकाशनांच्या नोंदणीचा २५वा अधिनियम (अॅक्ट) संमत करण्यात आला. ह्या अधिनियमाप्रमाणे प्रत्येक प्रकाशनाच्या ३ प्रती मुद्रित झाल्याबरोबर एका महिन्याच्या आत सरकारकडे पाठवाव्या असे ठरवण्यात आले होते{{Sfn|प्रियोळकर|१९४९|p=(१४)}}. १८६३मध्ये '''दि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड''' ह्या संस्थेंच्या अधिकाऱ्याने सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर इंडिया ह्यांना पत्र लिहून भारतातील संस्कृत किंवा इतर देशी भाषांत प्रकाशित होणाऱ्या ग्रंथांची माहिती युरोपीय अभ्यासकांना व्हावी ह्यासाठी आजवर प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एक शक्य तितकी परिपूर्ण सूची करावी असे सुचवले होते. त्याचा परिणाम म्हणून १८६७चा अधिनियम करण्यात आला असावा{{Sfn|प्रियोळकर|१९४९|p=(१५)}}.