"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६०१:
 
;'''चर्चा''' (Discussion)
 
== प्रचालक राहुल देशमुख ह्यांची विकिमिडीया इंडिया च्यापटरच्या संचालक पदी नियुक्ती (WMIN Chapter) ==
 
नमस्कार,
 
मला आपण सर्वांना सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे कि विकिमिडीया इंडिया च्यापटरच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकां मध्ये मराठी विकिपीडियाचे प्रचालक राहुल देशमुख हे संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
 
मराठी विकिपीडियावर फोटोथोन, महिला संपादनेथॉन, ह्यक्याथोन, वाचन प्रेरणा सप्ताह आदी वार्षिक कार्यक्रम त्यांनी सुरु केले आणि यशस्वी रित्या राबवित आहेत. मराठी विकीवर अनेक तांत्रिक प्रयोग, शासनाचा विश्वकोश प्रताधिकार मुक्त करणे, मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र शासन सोबत मराठी विकिपीडिया हि थीम घेऊन साजरा करणे, मराठी विकिस्रोत ची सुरुवात करणे, शासन तर्फे विकी शिकवण्या महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यात आयोजित करणे अश्या त्याच्या आजवर दिलेल्या अभनव योगदानाची हि पावतीच म्हणायला हवी.
 
 
राहुल देशमुख हे पेशाने अभियंते असले तरी भाषेबाबत त्याची बांधिलकी त्याचे कामावरून दिसून येते. ते विश्वकोश निर्मिती मंडळाचे तांत्रिक सल्लागार आहेत, विश्वकोशाच्या माहिती तंत्रज्ञान ज्ञानमंडळाचे सल्लागार आहेत तसेच महाराष्ट्रा शासनाच्या भाषा सल्लागार समितीच्या भाषा धोरणातील प्रसार माध्यमे विषयाच्या उपसमितीचे सदस्य आहेत.
 
 
विकिमिडीया इंडियाच्या त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत मराठी विकिपीडियास सोनेरी दिवस लाभोत अशी आशय करूयात. त्याच्या विकिमिडीया इंडियाच्या कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा ...!
 
 
[[सदस्य:Cherishsantosh | संतोष शिनगारे ]] १७:५१, १८ सप्टेंबर २०१७ (IST)