"भुईमूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले, उन्हाळी पीक कसे घ्यावे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ६:
एक तेलबी.
 
भुईमूग हे तेलवर्गीय महत्वाचे नगदी पीक आहे. पण काळाच्या ओघात त्याचे महत्त्व अन्नपीक म्हणून सुध्दा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
 
==== भुईमूग लागवड ====
रुंद वरंबे सरी या पद्धतीने भुईमूग लागवड करताना पूर्वमशागत करून रान भुसभुशीत झाल्यानंतर रुंद वरंबे व सरी तयार करण्यासाठी शेतात 150 सें.मी. अंतरावर खुणा करून, रेषा मारून आखणी करावी. पुन्हा रेषा मारलेल्या ठिकाणी 30 सें.मी. रुंदीचा पाट पाडल्यास 120 सें.मी. रुंदीचे व 15-20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार होतील. हे वाफे प्रथम पाणी देऊन पूर्ण भिजवून वाफस्यावर आल्यावर त्यावर 30 सें.मी. रुंदीच्या चार ओळी बसवून अशा ओळींत दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून बियाण्याची टोकण करावी.
"https://mr.wikipedia.org/wiki/भुईमूग" पासून हुडकले