"मो.रा. वाळंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
 
==लेखन कारकीर्द==
मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांनी [[महाराष्ट्र]] राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीसाठी व्याकरण विषयक पुस्तिकांचे लेखन करून त्यांच्या शालेय व्याकरण लेखनास सुरुवात केली. 'सुगम मराठी शुद्धलेखन' (१९५१) ही छोटी पुस्तिका<ref>मो. रा. वाळंबे, प्रस्तावना -मार्च १९८६,'मराठी शुद्धलेखन प्रदीप', पुनर्मुद्रण १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य रुपये पन्नास फक्त,ISBN 81-8169-27x</ref>, आणि सुगम मराठी व्याकरण लेखन (१९८८) {{दुजोरा हवा}} या पुस्तकांचे लेखन केले. वनराणी एल्सा नावाच्या बालसाहित्य पुस्तकाचा अनुवाद आणि संपादन केले. 'मराठी शुद्धलेखन प्रदीप'(प्रथमावृत्तीप्रथम मावृत्ती १९८१) हे त्यांचे पुस्तक आहे.
 
'सुगम मराठी शुद्धलेखन'ही प्रथम छोटी पुस्तिका होती. त्यानंतर श्री. वाळंबे यांनी 'सुगम मराठी शुद्धलेखन' याच नावाची आणखी एक पुस्तिका लिहिली, ती गो.य. राणे प्रकाशनाने १९६३ साली काढली. त्यानंतर 'शुद्धलेखन- परिचय' या नावाचे आणखी एक छोटे पुस्तक त्यांनी १९६५ साली लिहिले. या दोन्ही आवृत्त्या संपल्यामुळे त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' हे नवेच मोठे पुस्तक लिहिले. <ref>मो. रा. वाळंबे, प्रस्तावना -मार्च १९८६, 'मराठी शुद्धलेखन प्रदीप', पुनर्मुद्रण १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य पन्‍नास रुपये फक्त,ISBN 81-8169-27x</ref> या पुस्तकाची संपादित सुधारित आवृत्ती 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' याच नावाने नितीन प्रकाशन, पुणे ३० यांनी प्रसिद्ध केली.<ref>'मराठी शुद्धलेखन प्रदीप', मूळ लेखक मो. रा. वाळंबे, सुधारित आवृत्तीचे लेखक-संपादक : अरुण फडके, १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य ७५ रुपये, प्रथमावृत्ती १९८१, सुधारित आवृत्ती जानेवारी २००२</ref> त्याची प्रथमावृत्ती १९८१ साली आणि सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ साली प्रकाशित केली. नितीन प्रकाशनने या पुस्तकाचा सहा पानी सारांशही 'शुद्धलेखनविषयक नियम' या नावाने प्रसिद्ध केला. (त्यावर प्रकाशन तारीख दिलेली नाही.)
 
मो.रा. वाळंबे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या [[मराठी]] [[व्याकरणाची]] ५१वी आवृत्ती २०१६ सालच्या मार्चमध्ये निघाली आहे (<ref>नितीन गोगटे, प्रकाशकाचे दोन शब्द, पान ०४- १४ जानेवारी २००२, 'मराठीशुद्धलेखन प्रदीप', मूळ लेखक मो. रा. वाळंबे, सुधारित आवृत्तीचे [[लेखक]]-[[संपादक]] : अरुण फडके, १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य ७५ रुपये, प्रथमावृत्ती १९८१, सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ </ref>). याआधी पन्नासाव्या आवृत्तीनिमित्त ब्रेल लिपीमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प वाळंबे यांच्या कन्या सौ. [[सरोज टोळे]] यांनी हातात घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला असून ब्रेल लिपीतही हे पुस्तक आले आहे. पूर्वी एका खंडात असलेले हे पुस्तक आता दोनखंडी झाले आहे.
 
याखेरीज ‘आंग्ल भाषेचे अलंकार’, ‘श्री. बाळकृष्ण यांचे चरित्र’, ‘सुबोध वाचन (तीन भाग)’, आणि ‘शिकारीच्या सत्यकथा’ याही पुस्तकांचे लेखन वाळंब्यांनी केले होते.