"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइट वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
 
[[चित्र:Snake in basket.jpg|thumb|200 px|गारुड्याकडील नाग]]
भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात [[श्रावण महिना|श्रावण महिन्यात]] [[नागपंचमी]] साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पुजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारूडी लोक गावागावात फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यामधील]] [[३२ शिराळा]] या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो<ref>[http://www.indianetzone.com/1/nagpanchami.htm Nagpanchami, Indian Festival]</ref>. हजारो नाग या दिवसाकरीता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.
 
हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे.ते स्तोत्र खालीलप्रमाणे-
 
== गैरसमज==
 
नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे<ref>[http://www.wildlifesos.com/rprotect/snakemyths.htm सापांबद्द्ल गैरसमज]</ref>
 
* नाग दूध पितो- वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे नाग दूध पीत नाही.
* नाग गारुड्याच्या पुंगीपुढे नाचतो (डोलतो) - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारूडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारूडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
* नागीणीलानागिणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो.(ग्रामीण भागात याला '''डूख धरणे''' असेही म्हणतात.)
* नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो
 
===चित्रपटातील गैरसमजुती===
 
अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.
*सर्वांत प्रसिद्ध चित्रपट [[इ.स. १९८६|१९८६]] मधील [[श्रीदेवी]], [[अमरीश पुरी]] व [[ऋषी कपूर|ऋषीकपूर]] चा [[नागिन, चित्रपट|नागिन]] आहे ज्यामध्ये श्रीदेवी ही नाग तसेच मानवी रूप धारण करू शकत असते.
*[[जॅकी श्रॉफ]] चा दूध का कर्ज इत्यादी चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे. हा चित्रपट [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे
 
== संदर्भ==
५७,२९९

संपादने