३३,१२७
संपादने
छो खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
|||
'''प्रजनन''' ▼
सजीवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीमधील जननिक तत्वांचे “जनुकीय द्रव्याचे” होणारे संक्रमणम्हणजे प्रजनन. प्रत्येक सजीवाचा आयु:काल मर्यादित असतो. सजीव आयु:कालामध्ये जन्म, वृद्धि, विकास आणि मृत्यू अशा अवस्थेतून जातो. वृद्धिअवस्था एका ठरावीक मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर सजीव प्रजननक्षम होतो.
==प्रजनन प्रकार==
प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक या दोन प्रकाराने होते.
===अलैंगिक प्रजनन===
अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे. अलैंगिक प्रजननाचे काहीं प्रकार म्हणजे विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, अनिषेकजनन, खंडीभवन, बीजाणूनिर्मिती, आणि शाकीय प्रजजन. किण्व, यकृतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनुरात्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन ही अलैंगिक प्रजननाची उदाहरणे आहेत. एकपेशीय सजीवामध्ये बहुघा अलैंगिक प्रजनन होते. अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होत नाही. जिवाणू, कवके आणि काहीं वनस्पति यांच्यामध्ये अलैंगिक पुनुरुत्पादन होते. अलैंगिक प्रजननामध्ये प्रत्येक जीव जननक्षम असतो. त्यामुळे प्रजनन दर वाढतो. मात्र पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाति वैशिष्ठ्यांमध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते.
मानवी क्रमविकासामध्ये अर्भक, बाल्य, कुमार, यौवन, प्रौढ , आणि वार्धक्य अशा अवस्था आहेत. अर्भकाचा जन्म झाल्यापासून बालक पुरुष आणि स्त्री अवयव युक्त असले तरी कुमारावस्थेमध्ये प्रजननाशी संबंधित इंद्रियांच्या विकासास प्रारंभ होतो. युवावस्थेमध्ये हा विकास पूर्ण होऊन युवक-युवती प्रजननक्षम होतात. (पहा पौगंडावस्था) पुरुष प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव प्रामुख्याने शुक्राणू तयार करणे, ते सुस्थितीत कार्यक्षम राखणे आणि योग्य त्या वेळी त्यांचे वहन करणे व समागमाच्या वेळी स्त्री जनन संस्थेमध्ये त्यांचे क्षेपण करणे यासाठी विकसित झालेले असतात. पुरुष प्रजजन संस्थेमधील बहुतेक इंद्रिये बाहेरून दृश्य असतात. पुरुष प्रजजन संस्थेमधील बाहेरून दिसणारी प्रमुख इंद्रिये म्हणजे शिस्न, वृषणकोश आणि वृषण.
मेंदूमधील पियुषिका या अंतस्त्रावी ग्रंथीमधील संप्रेरके आणि वृषणामध्ये स्त्रवणारी पुरुष संप्रेरके यांच्या समन्वयाने पुरुष जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत असता जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण कुमारावस्थेत म्हणजे वय 10-12 च्या दरम्यान अग्र पोषग्रंथीमधून (पियुषिकेमधून) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन) तयार होण्यास प्रारंभ होतो. याच वेळी पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन) पियुषिकेमधून स्त्रवण्यास सुरवात होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या परिणामामुळे वृषणामधील अंतराली उतकामधील लायडिख पेशीमधून टेस्टोस्टेरोन हे पुरुषसंप्रेरक स्त्रवते. टेस्टोस्टेरोनमुळे सर्व जननेंद्रियाची वाढ होते आणि ती कार्यान्वित होतात. कुमारावस्था आणि पौगंडावस्थेमध्ये जननांगाची वाढ , पुरुष शरीरामधील स्नायू आणि हाडे बळकट होणे, अंडकोशावर आणि श्रोणिभागावर केस येणे, चेह-यावर दाढी मिशा येणे, आवाज फुटणे, त्वचा तेलकट होणे, आणि आपण लहान राहिलो नाही अशी जाणीव होणे असे शारिरिक आणि मानसिक बदल होतात.यासाठी टेस्टोस्टेरोन हे पुरुष संप्रेरक कारणीभूत आहे. पियुषिकेतील पोष संप्रेरक, पुटक उद्दीपक संप्रेरक ,पीतपिंडकारी संप्रेरक आणि वृषणामधील टेस्टोस्ट्रीरोन या संप्रेरकामुळे बालकाचे पौगंडावस्थेमधील पुरुषामध्ये रूपांतर होते. पौगंडावस्थेमध्ये चालू झालेली शुक्राणू निर्मिती अखेरपर्यंत टिकून राहते. फक्त वार्धक्यामध्ये शुक्राणु निर्मितीचा वेग कमीहोतो.
मानवी स्त्री प्रजनन संस्था अंडाशय, फॅलोपियन नलिका, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी या इंद्रियानी आणि प्रघ्राणग्रंथीनी बनलेली असते.
स्त्रीच्या जीवनामध्ये अर्भकावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था,पौगंडावस्था,प्रौढावस्था आणि वार्धक्य असे भाग पडतात. बाल्यावस्थेपर्यंत बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी जनन इंद्रियांची फारशी वाढ होत नाही. वयाच्या बारा वर्षापासून बाह्य आणि अंतर्गत जनन इंद्रियामध्ये झपाट्याने बदल होऊन ती मोठी होतात. हे सर्व बदल पोष ग्रंथीमधील एफएसएच (पुटक उद्दीपक संप्रेरक) आणि एलएच ( पीतपिंड संप्रेरक) या दोन्ही संप्रेरकामुळे अंडाशयामध्ये स्त्री संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोगेस्टेरॉन ही संप्रेरके आवशकतेनुसार तयार होतात.
|
संपादने