"प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १५:
[[शिस्न]] : हे समगमाचे पुरुष इंद्रिय आहे. [[शिस्न|शिस्नाचे]] तीन भाग असतात. त्याचा प्रारंभीचा भाग पोटास चिकटलेला असतो. मध्यभाग दंडगोलाकृति असतो आणि टोकाशी शिस्नमणि. शिस्नमण्यावर एक सैल त्वचावरण असते. काहीं जमातीमध्ये त्वचा शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात येते. शिस्नाच्या टोकावर मूत्रनलिका उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य वहन होते. शिस्नावर संवेदी चेतातंतूंची टोके असतात. शिस्नाचा दंडगोलाकृति भागामध्ये तीन वर्तुळाकृति पोकळ्या असतात. यामध्ये स्पंजासारख्या पोकळ उती असतात. या उतीमध्ये रक्त साठून राहिले म्हणजे शिस्न ताठ होते. समागमाच्या वेळी या शिस्नावाटे वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित करता येते. शिस्नावरील त्वचा सैल असल्याने शिस्नाचा आकार मोठा झाला तरी ते शिस्नास सामावून घेते. शिस्न ताठ झाल्यानंतर मूत्रनलिकेतील मूत्रप्रवाह तात्पुरता खंडित होतो. समागमाच्या वेळी वीर्यस्खलनास अडथळा न येण्यासाठीची ही योजना आहे.
 
[[वृषणकोश|वृषण]] : शिस्नाच्या खालील बाजूस पोटाजवळ असलेली सैल त्वचेची पिशवी म्हणजे वृषणकोश. वृषणकोशामध्ये वृषणे असतात. याना होणारा रक्तपुरवठा आणि चेता वृषणकोशा मध्ये प्रवेशतात. वृषणकोश वृषणाचे तापमान नियंत्रित करते. वृषणामध्ये शुक्रजंतू निर्मितीचे कार्य शरीराच्या तापमानापेक्षा थोड्या कमी तापमानास सुरळीतपणे होते. वृषणकोशाच्या स्नायूमुळे वृषणकोश सैल किंवा आकुंचन पावण्यास मदत करतात. थंडीमध्ये वृषणकोश शरीराजवळ तर उन्हाळ्यात ते शरीरापासून थोडेसे दूर ठेवले जातात. यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते. अति घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने वृषणकोशाचे तापमान शरीराएवढे होते आणि शुक्रजंतू निर्मितीमध्ये अडथळा येतो. शुक्रजंतूंची संख्या कमी होण्याचे हे एक कारण आहे.
 
[[वृषण]] : मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. सैल बंधनाने वृषणे वृषणकोशामध्ये स्थिर केलेली असतात. वृषणकोशाभोवती असलेल्या श्वेत प्रावरण आणि परिवृषण अशा दोन थरामुळे वृषणाचे संरक्षण होते. वृषणामध्ये रेतोत्पादक नलिकांचे मोठ्याप्रमाणात जाळे आणि अंतराली उतक व सर्टोली पेशी असतात. वृषणाच्या सूक्ष्म रचनेमध्ये रेतोत्पादक नलिकांचे मोठ्या प्रमाणात असलेले जाळे, अंतराली उतक आणि त्यातील अंतस्त्रावी पेशी असे असते. रेतोत्पादक नलिकेमध्ये शुक्रजनन पेशी आणि सर्टोलि पेशी असतात. शुक्रजनन पेशींचे विभाजन होऊन शुक्राणू तयार होतात. पेशीच्या आकाराचे शुक्राणूंचे पोषण सर्टोलि पेशीमधून होते. या वेळी त्यांचा आकार बदलून शुक्रजंतूसारखा होतो. रेतोत्पादक नलिकामध्ये दररोज तीन कोटि शुक्राणू तयार होतात. गुंतागुंतीच्या नलिका जालामधून सर्टोलि पेशींमधून स्त्रवलेला द्रव आणि शुक्राणू शुक्राणूवाहक नलिकेमध्ये वीर्याच्या स्वरूपात साठून राहतात.
ओळ ३०:
स्त्री प्रजनन संस्थेमधील बाहेरून न दिसणा-या इंद्रियामध्ये अंडाशय,अंडवाहिनी, गर्भाशय आणि योनि यांचा समावेश आहे.
'''अंडाशयबीजांडकोश''' : गर्भाशयाच्या प्रत्येक बाजूस एक अशीअसे दोन अंडाशये[[बीजांडकोश]] श्रोणिगुहेमध्ये असतात. त्यांचा आकार बदामासारखा असतो. अंडाशयामध्येबीजांडकोशामधे बीजांडे तयार होतात. अंडाशयामध्येबीजांडकोशामधे पोष ग्रंथीमधील एफएसएच आणि एलएच या संप्रेरकांच्या स्त्रवण्याप्रमाणे ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवतात. या संप्रेरकामुळे गर्भाशयातील अंत:त्वचा, निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण, आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.
 
'''अंडवाहिनी''': दोन्ही अंडाशयाजवळबीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सु 10-11.5 सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते. श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि अंडवाहिनीच्या आकुंचनामुळे अंडपुटक अंडवाहिनीच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्त्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.
 
'''गर्भाशय''': ही स्नायूंची त्रिकोणी पिशवी आहे. गर्भाशयाचे स्नायू अनैच्छिक असतात. गर्भाशयाची जाडी दोन सेमी आणि लांबी 7.5 सेमी असते. गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये पोष ग्रंथीमधील संप्रेरकांच्या संहतिनुसार बदल होतो. गर्भाशयाचे मुख्य भाग आणि मानेसारखा निमुळता ग्रीवा असे दोन भाग असतात. ग्रीवा योनिमार्गामध्ये उघडते. गर्भाशयाचे मुख्य कार्य गर्भधारणा, गर्भाच्या वाढीस मदत करणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती आहे. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे कार्य गर्भाशयाचे आहे.