"भालचंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
भाऊ कदम याचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ, घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.
 
==कारकीर्द==
==नाटके==
पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.
 
भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव 'फू बाई फू'साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी 'फू बाई फू'ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. 'फू बाई फू'च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.
 
==दुरचित्रवाणी==
दुरचित्रवाणी [[झी मराठी]]वर मराठी स्टँडअप विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’ यात आपल्या स्कीट्ससाठी ते प्रसिद्ध आहेत. ‘[[चला हवा येऊ द्या]]’ या झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या एका विनोदी कार्यक्रमात त्यांनी [[निलेश साबळे]] यांच्याबरोबर मुख्य भूमिका देखील बजावली आहे. या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णांचे चरित्र बजावले. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक अक्षरांमध्ये, भाऊ आपल्या हुशार कॉमिक वेळेसाठी अद्वितीय आहेत. अलीकडे या कार्यक्रमाने ३०० यशस्वी एपिसोड पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये कदम या कल्पित विनोदवीराने अभिनय केला आहे. अनुवांशिक विनोद करताना त्यांच्या निरागसतेने लाखो मराठी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी "[[तुझं माझं जमेना]]" नावाच्या एका कार्यक्रमामध्ये काम केले आणि आपल्या स्काट्सने प्रदर्शन करून जवळजवळ प्रत्येक झी मराठी पुरस्कार समारोह कार्यक्रमात आपली स्कीट प्रदर्शित करून भाग घेतला.