"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
===प्राचीन रोम येथील ग्रंथालये===
=== प्राचीन चीन येथील ग्रंथालये ===
===महाराष्ट्रातील ग्रंथालये===एक आेळख..
पारंपरिक ग्रंथालयांमध्येदेखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे, त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्‍नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्‍नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा० आपटे वाचन मंदिर). नेटिव्ह जनरलमध्ये बर्‍याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. {{संदर्भ हवा}}
 
ओळ ३३:
 
====महाराष्ट्रातील ग्रंथालय सेवक====
राज्यात १२,८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत २२,६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार २० हजार, ‘क' वर्गासाठी ६४ हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख २८ हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख ९२ हजार रुपये वार्षिक अनुदान देत आले आहे.. हे अनुदान एक एप्रिल २०१२ पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा ९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून २९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांचा एकूण मासिक पगार ५९२६ रुपये असतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा ८८८९ रुपये मिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते.. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार १५०० रु. होणार. महाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही.सपकक
 
== ग्रंथालयांचे प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले