"रामनवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुनर्रचना लिंट त्रुटी
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ramnavmi shobhayatra2.JPG|250px|thumb|रामनवमीची मिरवणूक]]
 
 
[[चैत्र शुद्ध नवमी]] हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या [[श्रीराम|रामाचा]] जन्म झाला. हा दिवस '''रामनवमी''' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा [[मूर्ती|मूर्तीस]] इतर [[हार|हारांसमवेतच]] [[गाठी]]पण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून [[प्रसाद]] वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/रामनवमी" पासून हुडकले