"मालिनी राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो वर्ग
ओळ ४३:
 
==पूर्वायुष्य==
मालिनीताईंचे बालपण भारतात [[राजस्थान]] राज्यात गेले. [[अजमेर]] येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी [[गणित]] विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून [[गोविंदराव राजूरकर]] व त्यांचा पुतण्या [[वसंतराव राजूरकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. वसंतराव राजूरकरांशी त्या पुढे विवाहबद्ध झाल्या.
 
==सांगीतिक कारकीर्द==
मालिनी राजूरकरांनी भारतातील नामांकित संगीत महोत्सवांतून आपली कला सादर केली आहे. त्यांत गुणीदास संमेलन ([[मुंबई]]), तानसेन समारोह ([[ग्वाल्हेर]]), [[सवाई गंधर्व महोत्सव]] ([[पुणे]]) आणि शंकर लाल महोत्सव ([[दिल्ली]]) या संगीत महोत्सवांचा समावेश आहे. मालिनीताईंचे [[टप्पा]] गायकीवर विशेष प्रभुत्व आहे. त्यांनी उपशास्त्रीय गायनही केले आहे. 'पांडू-नृपती जनक जया' व 'नरवर कृष्णासमान' ही त्यांनी गायलेली दोन [[मराठी]] नाट्यगीते विशेष लोकप्रिय आहेत.
 
मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, [[जितेंद्र अभिषेकी]] व [[कुमार गंधर्व|कुमार गंधर्वांचा]] प्रभाव आहे. त्यांनी इ.स. १९६४ साली आपले संगीत कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. भारतातील शास्त्रीय संगीत वर्तुळात लवकरच त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. त्यांनी इ.स. १९८० साली अमेरिकेत व इ.स. १९८४ साली इंग्लंडमध्ये यशस्वी संगीत दौरे केले. इ.स. १९७० सालापासून त्या [[हैदराबाद]] येथे राहतात.
 
==ध्वनिमुद्रिका==
ओळ ६९:
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]