"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
वर्ग
छो
छो (वर्ग)
'''कविता सुब्रमण्यम''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'' ;) ([[जानेवारी २५]], [[इ.स. १९५८]] - हयात) या [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहेत. विवाहानंतर त्या हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, (उडत्या चालीची हिंदी गाणीही गाऊ लागल्या आहेत.
 
कविता कृष्णमूर्ती या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती.
 
कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, [[रवींद्र जैन]] यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली.
 
==विवाह==
कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉ. एल. सुब्रमण्यम हे व्हायोलिनवादक आहेत.संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत. इ.स. १९९९ मध्ये, 'हे राम' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची आणि कविता कृष्णमूर्ती यांची भेट झाली. नंतर काही संगीताच्या कार्यक्रमांत दोघे भेटले, बोलले, त्यांची मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम जमले.
 
डॉ. एल. सुब्रमण्यम हे सुमारे २० वर्षे अमेरिकेत राहत होते. १९९६ मध्ये त्यांच्या पत्‍नीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना तीन लहान मुले होती. पत्नीच्या निधनानंतर ते मुलांना घेऊन भारतात आले आणि बंगलोरमध्ये स्थायिक झाले. ११ नोव्हेंबर १९९९ रोजी कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला. विवाहानंतर कविता सुब्रमण्यम बंगलोरला राहू लागल्या.
 
==पुरस्कार==
कविता कृष्णमूर्ती यांना इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००६ साली त्यांना [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले. पहिला पुरस्कार '१९४२ ए लव्ह स्टोरी' या चित्रपटासाठी 'प्यार हुआ चुपके से, ये क्या हुआ चुपके से ’ या गाण्यासाठी मिळाला होता.
 
विवाहानंतरचा पुरस्कार 'देवदास' चित्रपटातल्या 'डोला रे डोला' या गाण्यासाठी मिळाला,
 
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:हिंदी गायक]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
४९,३४४

संपादने