"पूर्वाफाल्गुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
भारतीय नक्षत्रमालिकेतील हे अकरावे नक्षत्र सिंह राशीत मोडत असून यात डेल्टा व थीटा लिओनीस असे दोन तारे आहेत. त्यांपैकी डेल्टा [ झोज्मा; विषुवांश ११ ता. ११ मि. २०.७ से., क्रांती + २०° ४८' ३२".१, प्रत २.५८; ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा पूर्वेचा योगतारा (प्रमुख तारा) आहे. अथर्ववेदामध्ये याचा पूर्वा फाल्गुनी असा उल्लेख आलेला आहे. याची देवता अर्यमा आणि आकृती शय्या मानतात. सिंहाकृतीपैकी पाठ व शेपूट या नक्षत्रात दिसते. मेच्या पहिल्या आठवड्यात हे नक्षत्र डोक्यावर दिसते.
 
ठाकूर, अ. ना.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)