"पोपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
तोता : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायानोसेफाला असे आहे. हा मुख्यतः अरण्यात राहणारा असला, तरी लागवडीखाली असलेल्या झाडीच्या प्रदेशातही हा आढळतो. हिमालायात १,८३० मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. तोता साळुंकीएवढा असतो. बांधा सडपातळ व शेपटी लांब, टोकदार असते; नराचे डोके निळसर तांबड्या रंगाचे; मानेभोवती हनुवटीपासून निघालेले बारीक काळे वलय;खांद्यावर मोठा तांबडा डाग; शेपटीची मधली पिसे निळी व त्यांची टोके पांढरी; मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा; मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय; खांद्यावर तांबडा डाग नसतो. चोच शेंदरी रंगाची असते.दाट जंगलात यांचे थवे आढळतात. बी व रानफळे हे यांचे मुख्य खाद्य होय. राघू किंवा कीर यांच्यापेक्षा हा जास्त वेगाने उडतो. याचा आवाज ‘ट्युई ट्युई’असा काहीसा असून मंजूळ असतो. इतर पोपटांप्रमाणे हा पिंजऱ्यातून बाळगीत नाहीत.यांचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत असतो.
संदर्भ : Boosey. E. J. Parrots, Cockatoos and Macaws, New York, 1956.
कर्वे, ज. नी.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)
"https://mr.wikipedia.org/wiki/पोपट" पासून हुडकले