"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टॉनिक मूव्हमेंट्स) यमुनेने पात्र बदलले. ती एकदम पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलजच्या पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंधू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पाण्याचा पुरवठा करणार्‍या हिमनद्या व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले.
लंडसेटने दिलेल्या माहितीनुसार प्राचीन सरस्वती नदी पूर्व राजस्थानातून अधिक पूर्वेच्या बाजूने वाहत असावी.डॉ.वाकणकर,डॉ.आर्य आणि इंगळे या अभ्यासकांना ओल्डहेम (१८९३),वाडिया(१९३८) अमलघोष ( १९६०) यांनी केलेल्या भू सर्वेक्षणाची मदत नक्की झाली. ही सर्वेक्षणे व्यक्तिगत स्वरूपाची होती.या सर्व विस्तृत सर्वेक्षणातून एक विषय स्पष्ट झाला की इ.स.पू.२००० वर्षांच्या मागे एक प्रचंड नदी,स्वत:ची पात्रे सतत बदलत ,राजस्थान,बहावलपूर, उत्तर सिंध किंवा कच्छच्या रणातून अरबी समुद्राला निरनिराळ्या मुखातून मिळत असावी. सरस्वती नदी अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी जी स्थित्यंतरे झाली ती पण ध्यानात घ्यावी लागतात. बिकानेर जवळची वाळू आणि मुरमाची उत्पत्ती पूर्व आद्याश्म युगातील असावी असे भू-शास्त्रज्ञ समजतात. नंतर सरस्वती अंगावर येणा-या वाळवंटाला टाळीत वाहू लागली.
कालांतराने सरस्वती कच्छच्या रणात वाहू लागली. नंतर बापपोखरणमार्गे ती उत्तर चौथ्या काळात (Late Quarternary period)अनेक लहान नद्यांना सामावून घेवू लागली.
[[चित्र:Sarasvati-ancient-river.jpg|इवलेसे|डावे|Sarasvati.png]]</div>