"शततारका (नक्षत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ ८:
 
[[वर्ग:नक्षत्र]]
भारतीय सत्तावीस नक्षत्रांपैकी हे चोविसावे नक्षत्र आहे. यात शंभर तारे आहेत अशी कल्पना आहे, म्हणून त्याचे नाव ‘शततारका’ असे पडले आहे. तथापि खगोलाच्या या भागात मोठे तारेच नाहीत. लँब्डा अँक्वारी हा या नक्षत्राचा योगतारा (प्रमुख तारा) असून तो जवळजवळ ⇨ क्रांतिवृत्तावरच आणि मीनास्य (फोमलहॉट) या मोठ्या ताऱ्याच्या उत्तरेस सु. २२० अंतरावर आहे. या ताऱ्याची ⇨ प्रत ३.८ असून त्याचे स्थान होरा २२ ता. ५० मि.; क्रांती – ७० ४९·५ [⟶ ज्योतिषशात्रीय सहनिर्देशक पद्धती] असे आहे. या नक्षत्राचे दुसरे नाव शतभिषज् किंवा शंतभिषा असे आहे. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र कल्याणप्रद, ऊर्ध्वमुख व मंदलोचन असे सांगितले आहे. याची देवता इंद्र (वरुण) व आकृती वर्तुळ कल्पिली आहे. या नक्षत्राचा अंतर्भाव कुंभ राशीत होतो.
ठाकूर, अ. ना.