"रेवती (नक्षत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
[[वर्ग:नक्षत्र]]
भारतीय २७ नक्षत्रांपैकी सत्ताविसावे म्हणजे शेवटचे नक्षत्र. या नक्षत्रात एकूण ३२ तारे असून त्यांमध्ये ठळक तारे जास्त नाहीत. यांपैकी ५.४ प्रतीचा [⟶ प्रत] झीटा पीशियम हा तारा [विषुवांश १ ता. ११ मि. ०.३६ से., क्रांती ७० १८' २"; ⟶ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या नक्षत्राचा योगतारा आहे. या ताऱ्याला कोणी जयंती असेही म्हणतात. उत्तरा भाद्रपदातील दक्षिणेकडील ताऱ्याच्या आग्‍नेयीस सु. १० अंशांवर सामान्यपणे पूर्व-पश्चिम अशी या अंधुक ताऱ्यांची ओळ पसरलेली दिसते. हे नक्षत्र नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मध्य मंडलावर येते आणि ३१ मार्चला सूर्य या नक्षत्रात प्रवेश करतो. या नक्षत्राचा समावेश मीन राशीत करतात. या नक्षत्राची आकृती ढोबळपणे मृदंगासारखी मानलेली असून नक्षत्राची देवता पूषा आहे. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र मृदुमैत्र, तिर्यङमुख व शुभ मानले आहे.
 
. ठाकूर, अ. ना.
पहा : नक्षत्र.
 
. ठाकूर, अ. ना.