"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ६३:
==माधवरावांचा मृत्यू==
[[इ.स. १७७२]] मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन [[थेऊर]] येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.
 
==माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील पुस्तके==
* माधवराव पेशवा (बालसाहित्य, लेखक मदन पाटील)
* रमा माधव (ऐतिहासिक चित्रपट. दिग्दर्शक [[मृणाल कुलकर्णी]])
* श्रीमंत थोरले माधवराव पेशवे (सखाराम अच्युत सहस्रबुद्धे)
* स्वामी (कादंबरी, [[रणजित देसाई]])
 
==संदर्भ सूची==