"लोह युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ६:
 
==सांस्कृतिक महत्व==
लोहारांना वेदात कर्मार ही संज्ञा दिली आहे. मुंड लोकात लोहाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुंड म्हणजे लोह असा अर्थ प्रचलित झाला असावा.या संस्कृतीच्या लोकांचा वंश कोणता याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र त्‍यांच्या काळ्या-तांबड्या खापरांची बनावट उत्कृष्ट असून त्यांचे आकारही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.त्यावरील नक्षीकाम सुंदर असून,त्यात [[स्वस्तिक]] हे प्रतीक अनेक जागी आढळते.या संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की या संस्कृतीचे लोक मृतांना दगडी कुंडात अथवा मातीच्या शव पेटिकेत पुरून त्यावर मोठ्या मोठ्या दगडांची वर्तुळे अथवा दगडी सोटे उभारीत. अशा तर्‍हेची काही दफने आढळली आहेत..<ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठवा </ref>
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोह_युग" पासून हुडकले