"जोसेफ हुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
१८६४ साली न्यूझीलंडच्या सफरीनंतर ‘हँडबुक ऑफ न्यूझीलंड फ्लोरा’ या ग्रंथातून न्यूझीलंडमधील वनस्पतींचे विवेचन सादर केले, तर सन १८७२ ते १८९७ या काळात त्यांनी भारतीय उपखंडातील वनस्पतींवर संशोधन केले. जॉर्ज बेंथम या सहयोगी शास्त्रज्ञाबरोबर लिहिलेल्या ‘जेनेरा प्लँटारम’ या गाजलेल्या पुस्तकातून वनस्पती वर्गीकरणाची पद्धती त्यांनी सादर केली.
 
वनस्पती वर्गीकरणाचा पाया घालणार्‍या सर हुकरने भारतीय उपखंडात दूरवर भ्रमंती करून हिमालयातील दुर्मीळ वनस्पती सर्वप्रथम जगापुढे आणल्या. त्यांनी सर्वप्रथम विस्तृत संशोधन करून ‘फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथातून भारतीय उपखंडातील सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद व वर्गीकरण सादर केले.
 
सर हुकर यांनी हिमालयातील वनस्पतींवर लिहिलेल्या ‘हिमालयन जर्नल्स’ या पुस्तकात दार्जिलिंग व सिक्कीममधील घनदाट जंगलांबाबत व हिमालयातील दुर्मीळ प्रजातींबाबत विस्तृत विवेचन आहे.