"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
 
==लेखन वैशिष्ट्ये==
बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा. रं. बोराडे यांच्या कथा कादंबऱ्यांतकादंबर्‍यांत महिलांची व्यक्तिचित्रेही अत्यंत समर्थपणे आली आहेत. त्यांच्या ‘नाती-गोती’ या कथासंग्रहात अशा महिला जवळपास प्रत्येक कथेत वाचकांना भेटतात. ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही रा.रं. बोराडे यांनी लिहिल्या. या कथांतून ते ग्रामीण माणसांच्या मनाचा ठाव घेतात. या लेखनगुणांमुळे बोराडे यांना मोठा वाचकवर्ग लाभला. महाराष्ट्रातच नव्हे, तर [[मराठी भाषा]] जाणणाऱ्या भारतभरातील विविध प्रांतांत त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे. ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबऱ्यांतकादंबर्‍यांत समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन' कादंबऱ्यातहीकादंबर्‍यांतही तिची गणना केली जाते. ही कादंबरी लिहायला बोराडेंना तीन वर्षे लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11246318.cms
| शीर्षक =नवलेखकांच्या पाठीशी उभे राहण्यात खरा आनंद
| भाषा = मराठी
| ॲक्सेसदिनांक =९ एप्रिल, २०१२
}}</ref> त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीनेही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळविला. या कादंबरीचे नंतर बोराडे यांनी याच नावाने नाट्यरूपांतर केले. स्त्री-पुरुषांतील सत्तासंघर्षाचे अत्यंत थरारक चित्रण या कादंबरीत आणि नाटकात येते. ‘आमदार सौभाग्यवती' या नाटकाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो प्रयोग झाले. मराठीतील अभिनेत्री [[ज्योती चांदेकर]] यांनी या नाटकात नायिकेची भूमिका केली होती. 'राजकीय नाटक आणि आमदार सौभाग्यवती' या नावाचा एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. प्रा. त्र्यंबक महाजन यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. [[दासू वैद्य|प्रा. दासू वैद्य]] यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. साध्या सोप्या मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी बोराडे आग्रही आहेत. सर्वसामान्यांना, अगदी निरक्षरांनाही कळेल अशी सोपी, अर्थपूर्ण भाषा प्रसारमाध्यमांनी वापरली पाहिजे. वाचक, श्रोता, प्रेक्षक बदलत आहे, त्यांच्या गरजाही बदलत आहेत. हे लक्षात घेऊन भाषाही बदलली पाहिजे, असे मत रा. रं. बोराडे यांनी वारंवार व्यक्त केले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137166:2011-02-17-19-20-35&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61
| शीर्षक =सर्वसामान्यांची भाषा प्रसारमाध्यमांनी वापरावी