"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
द्विरुक्ती काढली
(द्विरुक्ती काढली)
{{उदयोन्मुख लेख टीप | वर्ष =२०१२ | दिनांक =१ जानेवारी }}
 
[[चित्र:Tabla.jpg|right|thumb|250px|right|तबला (डावीकडे) आणि डग्गा (उजवीकडे)]]
[[चित्र:Rimpa shiva.JPG|thumb|महिला तबलावादक [[रिंपा शिवा]]]]
'''तबला''' हे एक [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात हिन्दुस्तानी संगीतात]] वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. ''तबला-जोडी'' ही दोन भागांची असते. उजखोर्‍या व्यक्तीच्या उजव्या हातास ''तबला'' (किंवा ''दाया'') व डाव्या हातास ''डग्गा'' (किंवा ''बाया'')असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक ''तबलजी'' वा ''तबलिया'' म्हणून ओळखले जातात.
 
== इतिहास ==
[[चित्र:Stone_carvings_at_Bhaje_caves.jpg||thumb|300px|भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्री]]
तबल्याच्या उत्पत्तीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. इ.स.पूर्व २०० मध्ये [[भाजे]] येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे [[सातवाहन]] काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे सिद्ध करता येते. अर्थातच इतर कोणताही विरोधी पुरावा नसल्याने हे वाद्य भारतात बनले असेही म्हणता येते.
 
तरीही काही लोक तबल्याचा जनक म्हणून [[अमीर खुस्रो|अमिर खुस्रोकडे]] पाहतात. तबला ह्या वाद्याचे मूळ ‘तब्ल ’ या अरबी वाद्यात असावे असे म्हणतात. इब्न खुर्दाद बिह ह्या इतिहासकाराच्या मते तब्लच्या निर्मितीचा मान तबल् बी लमक ह्या अरबी कलावंताकडे जातो. नंतर हे वाद्य मोगलांकरवी भारतात आले असावे दावा केला जातो. तरीही तबल्याला मृदंग–पखावजाप्रमाणे लावण्यात आलेली ‘शाई ’ यामुळे या वाद्याचे भारतीय मुळ अधोरेखित होते. कारण सुमारे अठराव्या शतकापर्यंत शाई ही फक्त चीन आणि भारतात बनवली जात असे. १२९६ ते १३१६ च्या दरम्यान तबल्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊन ख्याल व टप्प्यासारख्या संगीतरचनांबरोबर त्याचा साथीसाठी वापर होऊ लागला. तथापी संगीत रत्नाकर या बाराव्या शतकातील ग्रंथात तालांचे आणि तबल्याच्या बोलांचे वर्णन आहे. यामुळे अमीर ने तबल्यात सुधारणा केली हा दावा ही फोल ठरतो. भाजे येथील कोरीवकामाचा पुरावा हे सिद्ध करतो की अमीर खुस्रो ने तबल्याचा शोध लावला हा दावा खोटा आहे. मोगल राज्यकर्त्यांनी आपल्या सोईची आणि मओगल श्रेष्ठ असल्याचा गैरसमज पसरवण्यासाठी म्हणून ही कथा प्रसृत केली असे म्हणता येते. [[पखवाज|पखवाजाचे]] दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात [[दिल्ली|दिल्लीच्या]] सिद्धारखॉँ यांनी प्राचीन तबल्याची सद्य कालीन तबल्याची शैली परत प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.
== घडण ==
[[चित्र:Tabla-parts.jpg|left|250x250px250px|thumb|तबल्याचे विविध भाग]]
=== तबला ===
चांगल्या प्रतीच्या साधारण एक लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. [[खैर|खैराचे]] वा [[शिसव|शिसवी]] [[लाकूड]] यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावर यावर जनावरांचे चामडे लावून बसवण्यात येते. या कातडी आवरणास ''पुडी'' असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास '''चाट''' (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवतालच्या कातड्यास ''लव'' किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध '''शाई''' लावण्यात येते. तबल्याची '''पट्टी''' (आवाजाचा पोत) शाईच्या थरावरून निश्चित होते. ही पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे [[संवादिनी|संवादिनी /बाजाच्या पेटीचा]] वापर करतात. हार्मोनियमवर सुरांच्या अनेक कळा (बटणे) असतात. तबल्याचे प्रकार यावरूनच मानले जातात. उदा. हार्मोनियमच्या ''काळी चार'' शी सम-स्वरात असलेला तबला ''काळी चारचा तबला'' म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर ''लावला'' तरी काही काळाने सुरात फरक पडतो. यासाठी वादनापूर्वी '''गठ्ठे''' (ठोकळे) वरखाली करून तबला परत स्वतःच्या पट्टीवर बसवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा ''टीपेकडे'' जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वात बाहेरची कड म्हणजे ''गजरा'' होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या ''वाद्या'' गजर्‍यातील या घरांमधून विणल्या जातात. तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस ''गुडरी'' म्हणतात. वाद्या वरच्या अंगाला गजर्‍यात तर खालच्या अंगाला गुडरीतून ओवलेल्या असतात.
३९,०३०

संपादने