"हिमोग्लोबिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रस्तावना
ओळ १:
[[चित्र:1GZX Haemoglobin.png|250px|thumb|हिमोग्लोबिनची रचना]]
'''हिमोग्लोबिन''' हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन[[प्राणवायू]] वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायुप्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बणडायऑक्साईडकार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनव्दारेहिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.<br />
 
==रचना==
फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बनडायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करत असते. रक्तातील तांबड्या रक्तकणिकांमध्ये असणारे हे प्रथिन चार ग्लोब्युलीन प्रथिन-शृंखलाचे बनलेले असते. प्रत्येक शृंखलेत हिम नावाचे पोरफायरीन हे लोह-युक्त संयुग असते. या संयुगामुळेच रक्त लाल दिसते. हिम संयुगामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड वहन शक्य होते. हिमोग्लोबिनमुळेच तांबड्या रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात.<br />
Line १७ ⟶ १९:
पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उंचावरती हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असल्याने शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी या मंडळीत नैसर्गिकरित्याच हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. सतत धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. ज्यावेळी रोग्याला काही कारणाने निर्जलीकरण होते, तेव्हाही शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अर्थातच असे वाढीव प्रमाण फसवे असते; कारण धुम्रपान किंवा निर्जलीकरण या दोन्ही बाबी आरोग्यास केव्हाही हानीकारकच आहेत. फुप्फुसांच्या काही रोगात तसेच काही प्रकारच्या अर्बुदांमुळे हिमोग्लोबिन वाढलेले दिसते. खेळाडूंनी जर उत्तेजक द्रव्ये प्राशन केली, तर त्यामुळेही अशा प्रकारचे बदल हिमिग्लोबिनच्या प्रमाणात होतांना दिसतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे.
 
[[चित्र:1GZX Haemoglobin.png|250px|thumb|हिमोग्लोबिनची रचना]]
 
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:शरीरशास्त्र]]