"ऑरेलियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४०:
रोमन साम्राज्यास [[तिसऱ्या शतकातील संकटपर्व]] संपवण्यासाठी त्याचे हे विजय कारणीभूत असल्याने ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. सम्राट [[डोमिशियन]] हा डॉमिनस एट् ड्यूस (लॅटिन: dominus et deus, स्वामी व देव) ही पदवी लावणारा पहिला सम्राट असला तरी अशा पदव्या ऑरेलियनच्या कारकिर्दीपर्यंत अधिकृत कागदपत्रांवर लिखित स्वरूपात नव्हत्या. फ्रान्समधील [[ओर्लेयों]] या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे.
==सुरुवातीचे आयुष्य==
ऑरेलियनचा जन्म इ.स. २१४ च्या ९ सप्टेंबर रोजी झाला, परंतु त्याचे जन्मवर्ष इ.स. २१५ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याच्या जन्मस्थानाबाबत प्राचीन स्रोतांत एकमत नसले तरी तो मूळचा [[इलिरिकम]] या प्रदेशातील असल्याचे मानले जाते. डॅन्युबच्या पलीकडील [[डेशिया (रोमन प्रांत)|डेशिया]]तून माघार घेतल्यावर सम्राट ऑरेलियनने वसवलेले सिर्मियम हे पॅनोनिया इन्फरियर या प्रांतातील (आजचे स्रेम्स्का मिट्रोव्हिका, [[सर्बिया]]) शहर त्याचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. ऑरेलियनचा जन्म सामान्य घरात झाला व त्याचे वडील हे शेतकरी होते व त्यांनी आपले रोमन नाव हे त्यांच्या ऑरेलियस घराण्याचा संसद सदस्य असलेल्या जमीनदाराकडून घेतले यावर इतिहासकारांचे एकमत आहे. ऑरेलियनचे कुटुंब हे मूळचे रोमन असल्याचे व समाजाच्या उच्चस्तरावर असल्याचे साँडर्स या इतिहासकाराने मांडले आहे परंतु त्याच्या मतास सदर्न व वॅटसन अशा नंतरच्या इतिहासकारांनी समर्थन दिलेले नाही.
 
प्राचीन स्रोतांमधील पुराव्यांनुसार ऑरेलियनची आई ही ऑरेलियस वंशाची मुक्त केलेली गुलाम व तिच्या गावातील [[सोल इन्व्हिक्टस|सूर्यदेवाची]] पुजारीण असल्याचे मांडले गेले होते. तसेच रोममधील सूर्यदेवाच्या पंथाची देखभाल करण्याचे कार्य ऑरेलियस घराण्याकडे दिले गेले होते. या दोन गोष्टींमुळे सम्राट झाल्यावर ऑरेलियनने दाखवलेली सूर्यदेवावरील श्रद्धेचे स्पष्टीकरण करता येते. परंतु आता हा तर्क केवळ शंकास्पद माहितीवरून काढलेला निष्कर्ष एवढाच समजला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑरेलियन" पासून हुडकले