"ऑरेलियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४२:
ऑरेलियनचा जन्म इ.स. २१४ च्या ९ सप्टेंबर रोजी झाला, परंतु त्याचे जन्मवर्ष इ.स. २१५ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याच्या जन्मस्थानाबाबत प्राचीन स्रोतांत एकमत नसले तरी तो मूळचा [[इलिरिकम]] या प्रदेशातील असल्याचे मानले जाते. डॅन्युबच्या पलीकडील [[डेशिया (रोमन प्रांत)|डेशिया]]तून माघार घेतल्यावर सम्राट ऑरेलियनने वसवलेले सिर्मियम हे पॅनोनिया इन्फरियर या प्रांतातील (आजचे स्रेम्स्का मिट्रोव्हिका, [[सर्बिया]]) शहर त्याचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. ऑरेलियनचा जन्म सामान्य घरात झाला व त्याचे वडील हे शेतकरी होते व त्यांनी आपले रोमन नाव हे त्यांच्या ऑरेलियस घराण्याचा संसद सदस्य असलेल्या जमीनदाराकडून घेतले यावर इतिहासकारांचे एकमत आहे.
 
प्राचीन स्रोतांमधील पुराव्यांनुसार ऑरेलियनची आई ही ऑरेलियस वंशाची मुक्त केलेली गुलाम व तिच्या गावातील [[सोल इन्व्हिक्टस|सूर्यदेवाची]] पुजारीण असल्याचे मांडले गेले होते. तसेच रोममधील सूर्यदेवाच्या पंथाची देखभाल करण्याचे कार्य ऑरेलियस घराण्याकडे दिले गेले होते. या दोन गोष्टींमुळे सम्राट झाल्यावर ऑरेलियनने दाखवलेली सूर्यदेवावरील श्रद्धेचे स्पष्टीकरण करता येते.
 
==लष्करी कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑरेलियन" पासून हुडकले