"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
==संस्कृती==
प्रकृती म्हणजे निसर्ग.विकृती म्हणजे त्यात होणारा विकार किंवा बिघाड.आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार किना बिघाड होऊ नये या उद्देशाने तिच्यावर करायचे विविध सम्यक् संस्कार होत.
संस्कृतीचे स्थूल मानाने तीन विभाग-<br>
 
१.आधिभौतिक-बाह्य विश्वावर संस्कार करून त्याला मानवाच्या उन्नतीसाठी उपकारक बनविणे,हा संस्कृतीचा आधिभौतिक विभाग होय.शेती,पशुपालन,स्थापत्य,धातुकाम,यंत्र निर्मिती,नगर रचना,औषधी संशोधन,अर्थोत्पादन आणि वितरण या सर्व गोष्टी आधिभौतिक या विभागात येतात.<br>
 
२.आधिदैविक- भाग्य अनुकूल व्हावे,प्रयत्न सफल व्हावे, तसेच बाधा आणि संकटे निरस्त व्हावी या उद्देशाने देवतांची पूजा आणि प्रार्थना करणे ,जपतपादी आचरणे,मंत्र तंत्र आणि तोने टोटके करणे आणि या सर्व क्रियांच्या द्वारे विश्वाअंतर्गत अदृश्य अशा दैवी शक्तीचे साहाय्य प्राप्त करून घेणे या गोष्टी संस्कृतीच्या या विभागात येतात.<br>
 
३. आध्यात्मिक- स्वत:च्या मन-बुद्धीवर संस्कार करून त्यांना आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून देणे,हा संस्कृतीचा आध्यात्मिक विभाग होय.धर्म, तत्वज्ञान,नीतीनियम ,विद्या-कला,सद्गुण,शिष्टाचार ,संस्कार इ. सर्व गोष्टींचा अंतर्भाव संस्कृतीच्या आध्यात्मिक विभागात होत असतो.<br>
 
==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==
१४,७७९

संपादने