"ऑरेलियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४०:
रोमन साम्राज्यास [[तिसऱ्या शतकातील संकटपर्व]] संपवण्यासाठी त्याचे हे विजय कारणीभूत असल्याने ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. सम्राट [[डोमिशियन]] हा डॉमिनस एट् ड्यूस (लॅटिन: dominus et deus, स्वामी व देव) ही पदवी लावणारा पहिला सम्राट असला तरी अशा पदव्या ऑरेलियनच्या कारकिर्दीपर्यंत अधिकृत कागदपत्रांवर लिखित स्वरूपात नव्हत्या. फ्रान्समधील [[ओर्लेयों]] या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे.
==सुरुवातीचे आयुष्य==
ऑरेलियनचा जन्म इ.स. २१४ च्या ९ सप्टेंबर रोजी झाला, परंतु त्याचे जन्मवर्ष इ.स. २१५ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याच्या जन्मस्थानाबाबत प्राचीन स्रोतांत एकमत नसले तरी तो मूळचा [[इलिरिकम]] या प्रदेशातील असल्याचे मानले जाते. डॅन्युबच्या पलीकडील [[डॅशिया (रोमन प्रांत)|डॅशिया]]तून माघार घेतल्यावर सम्राट ऑरेलियनने वसवलेले सिर्मियम हे पॅनोनिया इन्फरियर या प्रांतातील (आजचे स्रेम्स्का मिट्रोव्हिका, [[सर्बिया]]) शहर त्याचे जन्मगाव असल्याचे मानले जाते.
 
==लष्करी कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑरेलियन" पासून हुडकले