"दादा चांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर (जन्म : कोल्हापूर, १९ मार्च,...
(काही फरक नाही)

२३:४९, १४ जून २०१७ ची आवृत्ती

शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर (जन्म : कोल्हापूर, १९ मार्च, इ.स. १८९७; मृत्यू : पुणे, २७ जानेवारी, १९७६) हे मराठीतले एक संगीत दिग्दर्शक होते.

दादा चांदेकरंचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच दादा वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले.

१९३१ नंतर दादांनी सातार्‍याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रह्यचारी या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या’ या मीनाक्षीने गायिलेल्या गाण्याने तर त्या काळी चित्रपट-रसिकांना वेडच लावले होते. ज्या जयमल्हार चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लावणीप्रधान चित्रपटांचा पाया घातला, त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचे संगीत दादा चांदेकरांचे होते.

दादा चांदेकर उत्तम हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून त्यांनी बरेच दिवस काम केले.

दादा चांदेकर यांचे संगीत असलेली म्राठी नाटके

  • अशी रंगली रात्र पैजेची
  • काळे गोरे
  • जीव सरला पीळ उरला
  • ब्रह्मचारी

दादा चांदेकर यांचे संगीत असलेले मराठी चित्रपट

  • अमृत
  • अर्धांगी
  • कालियामर्दन (१९३५)
  • छाया
  • जय मल्हार (१९४७)
  • पहिली मंगळागौर
  • मोरूची मावशी
  • ब्रह्मघोटाळा,
  • ब्रह्मचारी
  • लपंडाव
  • सासरमाहेर
  • स्वराज्य सीमेवर (१९३७)