"स्वामीनाथन आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४०:
#पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर ,जलस्त्रोत पुनर्भरणाची सक्ती. 'दशलक्ष विहिरी पुनर्भरण' योजना याच खासगी विहिरींना नजरेसमोर ठेवून आखण्यात आलेली आहे.
#पंचवार्षिक योजनेत जास्तीत जास्त निधी सिंचनासाठी राखून ठेवून त्यातील जास्तीत जास्त खर्च हा लघुप्रकल्प, भूजलपातळी वाढ आणि पाणी जिरवण्यासाठी करणे.
 
==शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना==
#माफक दरात आरोग्य विमा उपलब्ध करून द्यावा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. आत्महत्या बहुल क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनला जास्त काम करायला लावणे आवश्यक आहे.
#शेतकऱ्यांचा सहभाग असलेल्या शेतकरी आयोगाने सरकारी यंत्रणेचा त्वरित प्रतिसाद शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला मिळेल याची काळजी घेणे.
#सूक्ष्मपतपुरवठा योजना सक्षम कराव्यात आणि त्याचा आवाका तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि व्यवस्थापन या क्षेत्रात वाढवावा.
#मंडल किंवा ब्लॉक पद्धत प्रमाण न धरता गावाचे क्षेत्र प्रमाण धरून सगळ्या पिकांच्यासाठी विमा योजना राबवावी.
#वृद्धांना आरोग्यविमा आणि इतर सुविधा पुरवायला सामाजिक सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी.
#पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जलस्त्रोत पुनर्भरणाला उत्तेजन देणे. पाणी वापर आणि वाटप नियोजन गावपातळीवर करावे आणि प्रत्येक गावाला जल स्वराज्य मिळवणे आणि ग्रामसभा पाणी पंचायती म्हणून काम करतील अशी योजना राबवणे.
#उच्च गुणवत्तेच्या बियाणांचा आणि इतर पूरक बाबींचा योग्य वेळेला, योग्य ठिकाणी आणि परवडेल अशा दरात पुरवठा करावा.
#कमी जोखमीचे आणि कमी किमतीचे तंत्रज्ञान पुरवण्यात यावे, जेणेकरून पीक हातातून गेले तरीही होणारा तोटा मर्यादेत राहील.
#जिरा किंवा तत्सम पिके, जी कोरडवाहू भागात घेतली जातात, अशा पिकांच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी यंत्रणा उभारावी. सोबतच किमतीतले चढउतार सोसण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी उभारावा.
#शेतमालाच्या आयातीवर आयातशुल्क लावण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
#गरजेची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होण्यासाठी गावागावात माहिती केंद्र स्थापन करावीत.
#आत्महत्या करण्याची प्रवृत्ती किंवा लक्षण इतर माणसांना समजण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी.
 
==शेतीची उत्पादनक्षमता==