"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नाटक''' म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक [[व्यक्ती]] किंवा [[प्राणी]] यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, [[कथानक]], [[संवाद]], पदे, वाद्य[[संगीत]], पार्श्व[[संगीत]], [[नृत्य|नृत्ये]], संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, [[अभिनय]] आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. [[सॅम्युएल बेकेट|सॅम्युअल बेकेट]] यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्‌महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले