"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४७:
ऑस्ट्रिया व फ्रान्स यांच्यातील युद्ध शॉनब्रुनच्या तहानुसार समाप्त झाले. या तहातील एक कलम ऑस्ट्रियाकडून पश्चिम गॅलिशिया हा प्रांत पोलंडच्या राज्याला देण्याबाबत होते. रशियाने हे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात जात असल्याचे ओळखून हा प्रदेश रशियावरील आक्रमणासाठी संभाव्य आरंभ क्षेत्र असल्याचे ठरवले. १८११ साली रशियन सेनाधिकार्‍यांनी आक्रमक युद्धाचा आराखडा [[डान्झिग]] व [[वॉर्सा]] या शहरांवरचा हल्ला गृहीत धरून तयार केला.
 
पोलिश देशभक्त व राष्ट्रवाद्यांकडून अधिक साहाय्य मिळण्यासाठी नेपोलियनने या युद्धाचे नामकरण ''पोलंडचे दुसरे युद्ध'' असे केले. त्याने [[चौथ्या संघाचे युद्ध|चौथ्या संघाच्या युद्धास]] पोलंडचे "पहिले" युद्ध असे मानले कारण त्या युद्धात फ्रेंच अधिकृत ध्येयांमध्ये पूर्वी रशिया व प्रशिया यांत विभागल्या गेलेल्या पोलंड-लिथुआनिया या देशाच्या भूप्रदेशावर पोलंडची पुनर्स्थापना करणे हे एक ध्येय होते.
 
==व्यूहशास्त्र==