"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
 
आचार विषयाच्या संतार्ग्त [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]], [[वैश्य]] व [[शूद्र]] हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत. विद्यार्थ्यांची राहणी, त्याची दिनचर्या, त्याचे अध्ययनाचे विषय, आचार्याशी त्याची वागणूक, अनध्याय इ. विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विषयांचे वर्णन स्मृतीत केले आहे. त्यानंतर गृहस्थाचा धर्म, त्याची कर्तव्ये, अन्य आश्रमातील व्यक्तींशी त्याचा व्यवहार, गृहस्थाश्रमाची श्रेष्ठता, वानप्रस्थी व्यक्तीचे जीवन, त्याची कर्तव्ये, खऱ्या संन्याशाचे लक्षण, त्याचा धर्म, त्याचा दैनिक आचार इ. अनेक विषयांचे विवेचन स्मृतीत आढळते.याच बरोबर राजनीतीचे वर्णन ही विस्ताराने केलेले आहे.
स्मृतीत वर्णन केलेला दुसरा विषय म्हणजे व्यवहार . याला सांप्रत [[कायदा]] असे म्हणतात.फौजदारी कायद्याच्या कक्षेत दंड,दंडाचे प्रकार ,साक्षीदाराचे प्रकार,शपथ,न्यायाधीशाचे गुण , निर्णय देण्याची रीत ,करांची व्यवस्था इ .विषय स्मृतीत रोचकपणे वर्णिले आहेत.
<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>