"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८६४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
धर्मशास्त्राप्रमाणे सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्व आहे. [[हिंदु]]ंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते.
एकूणच भारतीय समाजाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते. भारतातील व्यवहाराचे म्हणजे कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे. [[इंग्रजी]] अमदानीत आणि सांप्रतच्या न्यायालयात दायभागाचे जे नियम केलेले आहेत, ते प्राचीन धर्मशास्त्रावर आधारलेले आहेत.
भारतीय समाजाची नीट व्यवस्था लावणे हे स्मृतीकारांचे प्रमुख कार्य होते.समाजाची उन्नती झाली की व्यक्तीचीही उन्नती होते, म्हणूनच प्रतेय्क व्यक्तीच्या अभ्युदयाची इच्छा करणा-या स्मृतिकारांनी अनेक व्यापक नियम केले.त्यामुळे निरनिराळ्या विदेशी आक्रमणाच्या काळातही भारतीय समाज टिकून राहू शकला.अशा रीतीने वैदिक संस्कृती व भारतीय समाज यांना प्रतिष्ठीत करण्याचे श्लाघनीय कार्य स्मृतिकारांनी केले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
 
==स्मृतिग्रंथात मांडलेले विषय==
१३,४८२

संपादने