"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३७:
अवेस्ता ग्रंथांत दोन पोटभाषांचे अस्तित्व दृग्गोच्चर होते. एक गाथांची जुनी भाषा व दुसरी नंतरच्या वाड्मयांत आढळून येणारी भाषा. पहिलीला गाथाअवेस्तन भाषा असे नाव आहे व दुसरीचे कनिष्ठ अवेस्तन नाव आहे. गाथाअवेस्तन भाषा आणि कनिष्ठ अवेस्तन भाषा या दोन भाषांमधील फरक वैदिकसंस्कृत व अभिजातसंस्कृत यांमधील फरकाप्रमाणे आहे. गाथांची भाषा फार शुद्ध असून वाक्यरचनाहि पण तितकीच शुद्ध असते. शब्दाच्या शेवटचा स्वर दीर्घ करण्यांत येतो. कनिष्ठ अवेस्तनभाषा मिश्र आहे. अपभ्रष्ट शब्द तीत बरेच येतात.
== लिपी ==
अवेस्तन भाषेच्या मानाने अवेस्तन लिपि ही बरीच मागाहूनची असावी असे दिसून येते या भाषेतील अक्षरे सस्सानियन काळांतील पहलवी लिपीपासून घेतली असावीत असे दिसून येते या लिपीत [[उर्दू]]प्रमाणेच उजवीकडून डावीकडे ओळ वाचावयाची असते. मूळच्या अवेस्तन लिपीसंबंधाची माहिती अद्यापि उपलब्ध नाही. अवेस्ता ग्रंथाचे पहलवीमध्ये रूपांतर सस्सानियन काळांत झाले. त्यावेळी अवेस्ता समजण्याची देखील अडचण पडू लागली होती. अवेस्तावर काही टीकाग्रंथ झाले होते असे दिसते; व अशा प्रकारचे टीकाग्रंथ मुसुलमानी अमदानीत म्हणजे [[ख्रिस्ती]] शकाच्या आठव्या नवव्या शतकांत देखील झाले होते याबद्दल पुरावा सापडतो. पहलवीमध्ये रूपांतर झालेल्या भागांपैकी, संपूर्ण यश्न, विस्परेद, वंदीदाद व इतर थोडा भाग उपलब्ध आहे. अवेस्ताचे शब्दश: भाषांतर व क्वचित् ठिकाणी विवरणार्थ टीपा असे या रूपांतराचे स्वरूप आहे. मूळ अवेस्तांतील वाक्यरचना देखील जशाच्या तशा भाषांतरात ठेवण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे, व ज्या ठिकाणी अशक्य होईल त्या ठिकाणी तेवढे नवीन प्रत्यय निर्माण करण्यात आले आहे. या पहलवी भाषांतरावरून प्राचीन काळी या झरथुष्ट्रांच्या धर्मासंबंधीच्या आपल्या कोणत्या कल्पना होत्या, अवेस्तामधील धर्मविषयक कायद्यांचा तत्कालीन लोक कशाप्रकारे अर्थ लावीत असत, तत्कालीन आचारविचार काय होते यासंबंधीची माहिती मिळते व या दृष्टीने या भाषांतराचे फार महत्त्व आहे. याशिवाय अवेस्तांतील एखाद्या क्लिष्ट शब्दाचा अर्थ या पहलवी रूपांतरावरून समजतो, या दृष्टीनेहि या भाषांतराचे महत्त्व आहे. या भाषांतरात पुष्कळ अशुद्धे व चुका आहेत व त्यात काही काही ठिकाणी विचित्र अर्थ करण्यात आला आहे हे खरे तथापि त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. अवेस्तन वाक्यरचनेबरहूकूम पहलवी भाषांतरांतहि तशीच वाक्यरचना करण्याचा प्रयत्‍न करण्यात आल्यामुळे भाषांतर फार बाजड झाले आहे. [[इ.स. १२००]] च्या सुमारास, धवल नावाच्या एका पारशी पाद्याच्या नेर्योसंघ नावाच्या मुलाने या पहलवी भाषांतराचे संस्कृतमध्ये रूपांतर केले. हे भाषांतर करताना याने हि पहलवी वाक्यरचना संस्कृतमध्ये तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न केल्याने संस्कृत भाषांतर फार क्लिष्ट झाले आहे संस्कृतांतील संधि-नियमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आढळते. सुमारे १६००-१८०० च्या सुमारास खोर्द अवेस्ताच्या पहलवी भाषांतराच्या कांही भागांचे अर्वाचीन पर्शुलिपीत रूपांतर करण्यात आले. तसेच १९ व्या शतकात या पहलवी रूपांतराची [[गुजराती भाषा]]ात दोन रूपांतरे झाली व त्यात बरीच चांगली वठली आहेत.
 
त्यानंतर पाश्चात्य यूरोपीय पंडितांचें याकडे लक्ष्य वेधलें. अवेस्ता ग्रंथाची मूळ लिपि शिकून त्या ग्रंथाचें भाषांतर करण्याचा पहिला मान अ‍ॅनक्कोटिल डू पेरा या फ्रेंच विद्वानास देणें जरूर आहे. त्यानें हिंदुस्थानांत येऊन अतिशय संकटांत दिवस काढून मोठ्या खटपटीनें इराणी भटजीजवळ या ग्रंथाचें अध्ययन केलें; त्या ग्रंथाच्या कांहीं प्रती मिळविल्या व त्या धर्मांतील विधींचांहि त्यानें थोडाफार परिचय करून घेतला. पारीस येथें परत आल्यानंतर त्यानें सतत दहा वर्षें या ग्रंथाचें अध्ययन करून १७७१ सालीं या ग्रंथाचें सटीक भाषांतर केलें.
 
या भाषांतरामुळें यूरोपमध्यें खळबळ उडून गेली. पुष्कळ लोकांनीं डू पेरानें मिळवलेल्या ग्रंथाच्या खोटेपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. यामध्यें सर जोन्स हा प्रमुख होता. त्यानें डू पेराला मिळालेली प्रत, साफ खोटीं असून त्याला पारशांनीं चकविलें असें प्रतिपादन केलें. त्याच्या उलट फ्रान्समध्यें डू पेराला पुष्कळ अनुयायी मिळाले व जर्मनीतील विद्वान क्लूकर यानें तर या डू पेराच्या भाषांतराचें रूपांतर करून व त्यांत भरपूर माहितीची भर घालून तें पुस्तक प्रसिद्ध केलें.
 
१८२५ च्या सुमारास पाश्चात्य संस्कृत पंडितांचें इकडे लक्ष्य वेधलें. संस्कृत व अवेस्तन भाषेंत बरेंच साम्य आहे असें डू पेरा वगैरे विद्वानांनीं सिद्ध केलेंच होतें. पण रस्क नांवाच्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञानें या दोन भाषांत काय साम्य आहे हें सप्रमाण दाखवून दिलें. हा पंडित स्वत:इराणमध्यें गेला होता व तेथून त्यानें अवेस्ता ग्रंथाच्या प्रती व पहलवी भाषांतरें जमवून आणलीं. १८२६ सालीं त्यानें एक छोटासा ग्रंथ लिहून त्यांत, अवेस्तन भाषा फार प्राचीन असून तिच्यामध्यें व संस्कृतमध्यें बरेंच साम्य आहे. ती भाषा संस्कृताहून भिन्न पण, निकटसंबद्ध आहे असें सिद्ध केलें व अवेस्ता ग्रंथांतील लिपीसंबंधाचेहि त्यानें बरेच शोध केले.
 
यानंतर बर्नाफ नांवाच्या फ्रेंच पंडितानें अवेस्ताचा अभ्यास चालविला होता. डू पेराच्या भाषांतरांत बर्‍याच चुका त्याला आढळल्यामुळें त्यानें नर्योसंघाच्या संस्कृत रूपांतराच्या सहाय्यानें अवेस्ता वाचला व डू पेराच्या भाषांतरांतील पुष्कळ चुका दुरुस्त केल्या. यानंतर या दिशेनें व विशेषत: अवेस्तन लिपीसंबंधानें वॉप, हॉग, विंडीशमन, वेस्तरगार्ड, रोट, स्पीजेल इत्यादि पंडितांनीं फार प्रयत्‍न केले. या पंडितांमध्यें, अवेस्ता ग्रंथाची माहिती करून घेण्याच्या कामीं, प्राचीन टीकाग्रंथाचा व तत्कालीन इतर उल्लेखांचा आश्रय करावयाचा अगर तौलनिक भाषाशास्त्राचें साहाय्य घ्यावयाचें यासंबंधीं वाद माजला होता. पण दोन्ही साधनें सापेक्ष व परस्परसाहाय्यकारी आहेत व त्या दोहोंचाहि उपयोग करून घेणें जरूर आहे हें मत हल्लीं प्रस्थापित झालें आहे. ['पारशी' पहा.]
 
== हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/अवेस्ता" पासून हुडकले