"दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८७८ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ४०:
 
== जीवन ==
सार्दिनियाचा सम्राट चार्ल्स अल्बर्ट आणि [[ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा]] या दांपत्याच्या पोटी व्हिक्टर इमॅन्युएलाचा जन्म झाला. तो चार्ल्स अल्बर्टाचा थोरला मुलगा होता. तरुणपणीची काही वर्षे त्याने [[फ्लोरेन्स|फ्लोरेन्सात]] व्यतीत केली. राजकारण, युद्धशास्त्र व खेळ या क्षेत्रांत त्याला सुरुवातीपासूनच रुची होती. [[इ.स. १८४२]] साली त्याने आपली मावसबहीण अ‍ॅडलेड हिच्याशी विवाह केला. सार्दिनियाचे राजेपद त्याच्याकडे येण्याआधी त्याला 'सवॉयाचा ड्यूक' म्हणून अभिधान दिले होते.
 
पहिल्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात तो आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली पास्त्रेंगो, सांता लुसिया, गॉइतो, कस्तोझा येथे आघाडीवर लढला.