"गर्भाधान संस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११०:
 
== १ उ. अशुभ काळात रजोदर्शन झाले असता गर्भाधानापूर्वी करावयाची शांती ==
‘रजोदर्शनासाठी अशुभ काळ आला असता मोठा दोष होतो. या दोषनिवारणासाठी ‘ऋतूशांती’ नावाचा विधी करावा लागतो. (या विधीला ‘भुवनेश्वरी शांती’ असे म्हणतात.) अशुभ असणारी [[नक्षत्रे]] पुढीलप्रमाणे आहेत – भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा आणि ज्येष्ठा. अशुभ असणारे योग याप्रमाणे – विष्कंभ, गंड, अतीगंड, शूल, व्याघात, वङ्का, परीघ, व्यतीपात, वैधृती आणि भद्रा. याचप्रमाणे पुढील कालावधीही अशुभ मानलेला आहे – ग्रहणकाल, मध्यरात्र, संधीकाल, अपराह्णकाल आणि निद्राकाल.
 
गर्भाधानापूर्वी करावयाच्या शांतीचा संक्षिप्तरूपाने विधी असा – प्रथम भुवनेश्वरी शांतीचा संकल्प करावा. श्री गणपतिपूजन, वरुणपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करावे. नंतर पंचगव्यमेलन करून स्थळाची शुद्धी करावी. तीन कलश एका ओळीत ठेवून मध्यभागी असलेल्या कलशावर श्री भुवनेश्वरीदेवी या मुख्य देवतेची प्रतिमा स्थापन करावी आणि तिची षोडषोपचारे पूजा करावी. श्री भुवनेश्वरीदेवीच्या उजव्या अंगाला असलेल्या कलशावर इंद्राणी आणि डाव्या कलशावर इंद्र या देवतांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे. त्यानंतर यज्ञकुंडात अग्नीची स्थापना करावी. नंतर इंद्राणी देवतेच्या कडेला नवग्रहमंडल स्थापन करून त्यांची पूजा करावी. नंतर यज्ञकुंडाकडे बसून पुढीलप्रमाणे अन्वाधान (आहुत्यांची संख्या निश्चित करणे) करावे. नवग्रहांसाठी अनुक्रमे रूई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, औदुंबर, शमी, दूर्वा आणि दर्भ या समिधांनी, तसेच चरु आणि आज्य यांनी २८ वेळा मंत्रांनी हवन करावे. तसेच भुवनेश्वरीसाठी दूर्वा, तीळमिश्रित गहू, पायस आणि तूप यांनी १००८ वेळा मंत्राने हवन करावे. नंतर इंद्र आणि इंद्राणी यांसाठी प्रत्येकी १०८ वेळा हवन करावे. हे शक्य नसल्यास श्री भुवनेश्वरीदेवीसाठी १०८ किंवा २८ आणि इंद्र-इंद्राणी यांसाठी २८ किंवा ८ वेळा हवन करावे. या वेळी वापरण्यात येणारे पायस होमावरच बनवलेले असावे; घरात केलेले नसावे. नंतर स्विष्टकृत् इत्यादी होमकर्म करून बलीदान, यजमान अभिषेक, विभूतीग्रहण आणि श्रेयोदान करावे.’ गर्भाधानसंस्कार प्रत्येक गर्भधारणेत पुन्हा करण्याची आवश्यकता नसते.