"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या [[वैदिक]] साहित्यात ;मृत्यूनंतर केल्या जाणा-या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ  आढळतात.दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-या प्रार्थनेत मृत शरीराला स्वत:मध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे. 
ब्रह्म पुराणात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही,जी आस्तिक वृत्तीची आहे,जी देवपूजा परायण आहे,जी ब्राह्मणाचा सत्कार करते ,जी कृतघ्नपणे वागत नाही ,जी कोणाची ईर्ष्या करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)<ref>धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. काणे पांडुरंग वामन </ref>
भारतीय [[तत्त्वज्ञान|तत्वज्ञान]] असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे परमेश्वर सन्निध असण्यासाठी अशा वेळी ओं नमो भगवते वासुदेवाय | असा जप करावा से सांगितले जाते.गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशी येते.उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारक मानला जातो असेही [[भगवद्‌गीता|गीतेत]] सांगितले गेले आहे.<ref>धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. काणे पांडुरंग वामन </ref>
 
दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे.जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले आहे. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे '''दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.'''