"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो नवीन माहिती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २६:
तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लहडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठच्या अव्ह्ल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येवून जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाड आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत उभा आहे....एकटाच वांद्राच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाची दर्शन ठिकठिकाणी होते. जिजामाता उद्यान, हँगिंग गार्डन, बोरिवलीच राष्ट्रीय उद्यान, पवईच उद्यान ते अनेक छोटी उद्यान जांभूळ वृक्षाच संवर्धन करीत आहे.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
== '''जांभूळ :''' ==
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले