"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४३:
भारतातील सामंतशाहीचे समकालीन स्वरूप [[हैदराबाद संस्थान]]ात पहावयास मिळते. [[तेलंगण]] प्रदेशात [[शेती]]ची रचना जमीनदारी पद्धतीची होती. मूठभर जमीनदारांच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी होत्या. गावेच्या गावे जमीनदारांच्या मालकीची होती. तेथील शेतमजूर हा त्यांचा वेठबिगार किंवा कूळ असे. वेठबिगार व कुळांची स्थिती अतिशय वाईट होती. [[मराठवाडा|मराठवाड्यात]] व [[कर्नाटक]]ात मोठ्या प्रमाणात जहागीरदार होते. हे जहागीरदार शेतकर्‍यांची व कुळांची पिळवणूक करत. त्यांच्यावर अत्याचार करत. भारतीय सामंतशाहीची मुळे येथेच दिसून येतात.
 
==सामंतशाहीचा र्‍हासऱ्हास==
मध्ययुगाच्या उत्तरार्धात [[युरोप]]मधील सामंतशाहीच्या र्‍हासासऱ्हासास सुरूवात झाली. सामंतशाही व्यवस्थेत अनेक दोष होते. ती विषमता व शोषणावर आधारलेली होती. युरोपाच्या अर्थव्यवस्थेत हळूहळू बदल होऊ लागले, वस्तुविनिमय ही परंपरागत पद्धती मागे पडून नाण्यांचे [[चलन]] अस्तित्वात आले, व त्याद्वारे आर्थिक व्यवहार होवू लागले, [[दळणवळण]]ाच्या साधनातील सुधारणेमुळे युरोपातील व्यापार वाढला. [[व्हेनिस]], [[जिनोआ]], [[फ्लॅारेन्स]] यांसारखी नविन बाजारपेठा असलेली [[शहर]]े उदयास आली. आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारा [[व्यापार]]ी व विक्रेत्यांचा नवा वर्ग युरोपात उदयास आला. या वर्गाने व्यापारवाढीसाठी राजांना पाठिंबा दिला. परिणामी राजे व राजसत्ता प्रबळ वनली. सामंतांचा प्रभाव कमी होऊ लागला. [[ख्रिस्ती]] व [[इस्लाम]]धर्मीयांत झालेल्या [[धर्म]]युद्धांत, ख्रिस्तीधर्माच्या रक्षणासाठी सामंत युद्धात सहभागी झाले. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी युरोपातील राजे पुढे आले. राजांची प्रतिष्ठा वाढली. राजेशाहीचे महत्त्व वाढले. सामंतांची सत्ता कमकुवत होत गेली आणि सामंतशाहीच्या र्‍हासास सुरूवात झाली. युरोपातील समाजव्यवस्था व [[अर्थव्यवस्था]] यांच्यात बदल घडून आल्यानेही सामंतशाही लोप पावत गेली. [[इ.स. १७८९]] मध्ये झालेल्या [[फ्रेंच राज्यक्रांती]]ने सामंतशाहीवर अखेरचा घाव घातला व सामंतशाहीचा शेवट झाला.
 
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]