"अभंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[लोकगीत ]]'''अभंग''' हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला [[कविता|काव्यप्रकार]] आहे. तसेच अभंग हा एक [[वृत्त छंद|वृत्त-छंदही]] आहे.
काव्यप्रकार म्हणून अभंगाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायातील]] [[संत|संतांनी]] या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. [[संत नामदेव]],[[संत ज्ञानेश्वर]] , [[संत एकनाथ]] इ संतमेळा्याचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी [[यमक]] जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
 
उदा. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले।।
 
अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३ व्या शतकातील [[नामदेव]]-ज्ञानेश्वरांपासून १७ व्या शतकातील निळोबांपर्यंत अनेक संतांनी प्रचंड अभंगरचना केली आहे. असे असले तरी [[संत तुकाराम]] यांनीच या काव्यप्रकाराला सर्वाधिक उंचीवर नेले. कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे माहात्म्य सांगितले जाते. आधुनिक काळातही [[केशवसुत|केशवसुतांपासून]] मर्ढेकर-करंदीकर व त्यापुढच्या पिढीतील दिलीप चित्रे व अरुण कोलटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. अभंगाचे वृत्त वापरून सामाजिक सुधारणेची व सत्यधर्माची शिकवण देणाऱ्या महात्मा [[जोतिबा फुले]] यांनी अखंड लिहिले. तेही अभंगाचेच वेगळे रूप होय.
 
महानुभव संप्रदायात अभंग या शब्दाला समाप्तीमुद्रा असे म्हटले आहे.( लीळाचरित्र ४२४.)
१६,००३

संपादने