"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पारशी लोकांचा धर्मग्रंथ - अवेस्ता
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:२६, २८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

अवेस्ता हा पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे. पारशी धर्म - संस्कृतीबद्दलचे विखुरलेले ज्या ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे त्याला ‘अवेस्ता’ असे म्हटले जाते.

हा ग्रंथ इराणची प्राचीन अवेस्ता भाषेत लिहिलेला आहे. या भाषेचे संस्कृत भाषेशी बरेचशे साम्य आहे. झोराष्ट्रियन या प्राचीन इराणी धर्माचा संस्थापक झरत्रुष्ट्र होते. त्यांनी स्थापित केलेल्या धर्माच्या नीती-नियमांबद्दलची माहिती या ग्रंथात आहे. इरत्रुष्ट्र यांनी ज्या रचना केल्या त्यास गाथा असे म्हटले जाते. रोमन ज्ञानकोशकार प्लिनी यांनी असे नमूद केले आहे की, अवेस्ताची संख्या २० लाख असावी, तर अरबी इतिहासकार अल् तबरी यांच्या मते या अवेस्ता १२ हजार चर्मपत्रांवर लिहिलेल्या होत्या.