"रानधोबी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

No edit summary
 
'''रानधोबी''' (इंग्रजी: Forest Wagtail) हा मोटॅसिलिडे या धोबी कुळातील पक्षी आहे. त्यांचा विशिष्ट असा पिसारा इतर धोबी पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे आणि ते शेपटी सुद्धा इतर पक्ष्यांप्रमाणे उभी न हलवता आडवी हलवतात.
 
==ओळख==
रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा [[रंग]] तपकिरी असतो. [[भुवया]] आणि [[डोळा|डोळ्यांभोवतिची]] कडी पांढरट असते. काळ्या पंखांवर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटीवरील भाग काळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा [[पांढरा|पांढऱ्या]] असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. छातीचा वरचा भाग काळा आणि खालच्या भागात तुटक काळा पट्टा असतो. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य [[भारत|भारतीय]] पर्वतीय प्रदेशात राहतात. [[पश्चिम घाट|पश्चिम घाटात]] [[महाबळेश्वर|महाबळेश्वरपासून]] दक्षिणेकडे [[केरळ]] आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच [[श्रीलंका]] आणि [[अंदमान]] बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, [[कॉफी|कॉफीची]] लागवड, तसेच [[बांबू|बांबूमिश्रित]] जंगले या ठिकाणी आढळतो.
 
१३४

संपादने