"भेंडलावा (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|भेंडलावा thumb|भेंडलावा या पक्...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

११:१२, २० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्षाला मराठीमध्ये इस्नाप (पु.), इस्नाफ (पु.),खेंकस (पु.),टिलवा (पु.),पाणलावा (स्त्री.)(भंडारा)तिबड (पु.)(रत्नागिरी),भेंडलावा (स्त्री.)(सिंधदुर्ग),टिंबा (पु.),टिंबे (नपुं.),टिंबली (स्त्री.),तामण (पु.),तई (स्त्री.),मोठा टिंबा (पु.),लहान टिंबा (पु.)(ठाणे) म्हणतात.Painted Snipe म्हणतात.हिंदीमध्ये राजचहा म्हणतात.संस्कृतमध्ये चित्रित कुणाल म्हणतात.गुजरातीमध्ये पानलवा,पान लौवा म्हणतात.

भेंडलावा
भेंडलावा

ओळख

आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सरळ बारीक पाणलाव्यासारखी चोच.टोकाला बाक.वरून हिरवाकंच.त्यावर बदामी,काळपट काड्या व रेघोट्या.खालून तपकिरी पांढरा.डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ.डोळ्यांजवळ पांढरा डाग.खांद्यावर पांढरी पट्टी.नर मादीपेक्षा कमी देखणा.मादीच्या गळ्यावर आणि छातीवर तपकिरी,तसेच,काळा रंग नसतो. उडताना डोळ्यांभोवतालचे पांढरे वर्तुळ,नेत्रानजीकची पांढरी पट्टी,ठिपक्या-ठिपक्यांचे पंख व पाठीवरील इंग्रजीतील V आकाराचा बदामी रंगाचा पट्टा चटकन नजरेत भरतो.

वितरण

भारत,पाकिस्तान,लंकाब्रह्मदेश येथे आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. भारतात जुलै ते सप्टेंबर या काळात वीण.

निवासस्थाने

दलदली व भाताची शेते.

संदर्भ

पक्षिकोश लेखक:मारुती चितमपल्ली.