"सोन चिखल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|सोनटिटवी thumb|सोनटिटवी या टि...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

११:३८, १७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या टिटवीला मराठीमध्ये सोनटिटवी (स्त्री.) असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Eastern Golden Plover असे म्हणतात.कोकणात हिला छोटा टिटवई (मेळघाट-अमरावती)म्हणतात.हिंदीमध्ये छोटा बटन म्हणतात.संस्कृतमध्ये प्राच्य स्वर्ण टिट्टिभ असे म्हणतात.गुजरातीमध्ये सोनेरी बतण टिटोडी म्हणतात.तमिळमध्ये कोट्टान म्हणतात.

सोनटिटवी
सोनटिटवी

ओळख

आकाराने तित्तिराएवढी.जाड डोके.काटकुळे पाय.कबुतरासारखी चोच.वरून उदी.त्यावर पांढऱ्या व सोनेरी टिकल्या.खालून पांढरी.छातीवर बदामी,करडा व त्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके.उडताना पंखाची टोके टोकदार त्यांवर पट्टे नसतात.उदी शेपटी पंख्याप्रमाणे पसरलेली.उन्हाळ्यात-म्हणजे विणीच्या हंगामात खालून काळी.थंडीच्या दिवसात पाहुणे म्हणून आल्यावर,तसेच ,वसंतात परत जाताना ते खालून रंगीबेरंगी आणि काळे-पांढरे दिसतात.नर-मादी दिसायला सारखेच असतात.थव्याने आढळतात..

वितरण

भारतीय उपखंड,नेपाळ,श्रीलंका,मालदीव,लक्षद्वीप,अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे.पूर्व आशिया आणि उत्तर अमेरिका येथे वीण.

निवासस्थाने

दलदली.धान्याची शेते,चिखलाणी आणि गवती कुरणे.

संदर्भ

पक्षिकोश लेखक:मारुती चितमपल्ली.